शुभम बायस्कार, प्रतिनिधी
भाजपच्या नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथे हल्ला करण्यात आल्याची घटना शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी रात्री घडली. राणांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत तीव्र प्रतिक्रिया उलटायला सुरुवात झाली आहे. भाजप कार्यकर्ते आक्रमक असून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. त्याच क्रमात भाजपचे नेते खासदार अनिल बोंडे चांगलेच संतापले आहेत. 'ईट का जवाब पत्थर से देंगे' असं म्हणत त्यांनी थेट विरोधकांना धारेवर धरलं आहे. त्यामुळे राणांवरील हल्ला प्रकरण चांगलच पेटण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीतील घटक पक्ष आहे. राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाने अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीच्या शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात बुंदिलेंना मैदानात उतरवण्यात आलं आहे. भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी बंडखोरी करत बुंदिले यांचा प्रचार सुरू केला आहे. दर्यापूर तालुक्यात विविध ठिकाणी राणांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. अशातच शनिवारी (16 नोव्हेंबर) खल्लार येथे नवनीत राणा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभा संपून त्या वाहनाकडे निघाल्या असताना विशिष्ट समाजातील तरुणांनी राणांना पाहून अश्लील इशारे केले, घोषणा देण्यात आला.
नक्की वाचा - 'बायकोकडून नवऱ्याला धमकी'; अजित पवार गटाच्या जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप
भाजप व युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देणाऱ्या युवकांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी दोन गटात चांगलाच राडा झाला. थेट नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकण्यात आल्या. एकंदरीतच राणांच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढले. त्यानंतर राणांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकाऱ्यांनी खल्लार ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. हल्लेखोरांवर अटक करावी अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तर खल्लार गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी गावात तळ ठोकून आहेत. या संपूर्ण स्थितीवरून भाजपचे नेते अनिल बोंड यांनी आक्रमक होत विरोधकांना धारेवर धरल आहे. नवनीत राणांवर ज्या पद्धतीने खुर्च्या फेकत हल्ला करण्यात आला हा संपूर्ण प्रकार चीड आणणार आहे. हिंदूंनी संयम सोडला असता तर एकही वाचला नसता असं म्हणत बोंडे यांनी 'ईट का जवाब पत्थर से देंगे' अशी भाषा केली आहे. यामुळे पुन्हा एकदा अमरावतीत भाजप आणि महाविकास आघडीत वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world