जाहिरात

Amravati News: 1500 केळीची झाडे जमीनदोस्त, शेतकऱ्यानेच फिरवला बुलडोझर, अमरावतीच्या बळीराजाची व्यथा

केळी उत्पादक शेतकरी हतबल झाला असून अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला आहे. अमरावतीमधूनही असाच प्रकार समोर आला आहे.

Amravati News: 1500 केळीची झाडे जमीनदोस्त, शेतकऱ्यानेच फिरवला बुलडोझर, अमरावतीच्या बळीराजाची व्यथा

शुभम बायास्कर, अमरावती:

Amravati Banana Farmer News: योग्य बाजारभाव मिळत नसल्याने राज्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. लाखो रुपये खर्च करुन उभी केलेली केळी बाजारात अवघ्या चार- पाच रुपये किलो भावाने विकण्याची वेळ आली आहे. या संकटामुळे केळी उत्पादक शेतकरी हतबल झाला असून अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला आहे. अमरावतीमधूनही असाच प्रकार समोर आला आहे.

 नेमकं काय घडलं? 

समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या अचलपूर येथील मुरलीधर जयसिंगपूरे या शेतकऱ्याने  बाजारात तीस ते चाळीस रुपये डझन असा दर केळीला असल्याने मातीमोल भावाने केळी खरेदी केली जात असल्याने  संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील केळीची बाग बुलडोझरने जमीनदोस्त केली केली आहे. भाव मिळत नसल्याने जगायचं कसं? असा सवाल आता या शेतकऱ्यांंनी उपस्थित केला आहे. 

वाहनांचे सर्टिफिकेट रिन्यूअल फ्री कमी करा, वाहतूक संघटना आक्रमक, केला गंभीर आरोप

केळीच्या पिकावर चालवला बुलडोझर...

या बागेमध्ये 1500 केळीची झाडे होती, त्यांनी एकूण नऊ लाख रुपयांचा खर्च केला होता मात्र प्रत्यक्षात तीनच लाख रुपये हातात आले त्यामुळे उत्पादनही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांना शेतात बुलडोझर चालून केळीची झाडे काढण्याचा खर्च देखील 22 हजार रुपये आला, बाजारात केळीला आता कवडीमोल भाव मिळत आहे.. त्यामुळे सरकारने केळी आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. 
नक्की वाचा - CIDCO News: ऑनलाइन अर्ज नोंदणीतल्या अडचणी दुर होणार? 4,508 घरांसाठी 2 दिवसात किती अर्ज?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com