शरद पवार सरदार तर अजितदादा कोण आहेत? बच्चू कडूंचा अमित शाहांना टोला

आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं की, शरद पवार सरदार आहे तर मग अजितदादा कोण आहे? लोक असं विचारणार अजित पवार कोण आहेत? सरदाराचे पुतणे आहेत का? असा सवाल बच्चू कडू यांना केला.

Advertisement
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, अमरावती

शरद पवार देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहे, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या अधिवेशनात केला. अमित शाह यांच्या टीकेचे पडसाद आता उमटू लागले आहे. शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहे तर मग अजित पवार कोण आहेत? असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं की, शरद पवार सरदार आहे तर मग अजितदादा कोण आहे? लोक असं विचारणार अजित पवार कोण आहेत? सरदाराचे पुतणे आहेत का? अमित शहा यांच्या तोंडातून चुकून असं वक्तव्य निघालं असेल. ते विसरभोळे आहेत बऱ्याचदा अमित शहा चुकीचे बोलतात मग नंतर अंगलट येते. 

(नक्की वाचा -  'शरद पवार देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार' शहांचा हल्लाबोल)

भ्रष्टाचाराचे आरोप करुन शरद पवारांना सोबत घेण्याचा भाजपचा डाव आहे का? या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, मला असं वाटत नाही. शरद पवार एवढे कच्चे खेळाडू नाही की भाजपमध्ये जातील. असं असतं तर आतापर्यंत ते गेले असते. आता फक्त अजित पवार शरद पवारासोबत जाऊ नये म्हणजे झालं, असा चिमटाही बच्चू कडू यांनी काढला.

(नक्की वाचा - मुंबईत ठाकरे गटाचा धक्का, 4 माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार)

अमित शाह नेमकं काय म्हणाले?

शरद पवार हे नेहमी खोटं बोलतात. ते आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. पण एक गोष्ट आहे ती म्हणजे या देशात भ्रष्टाचाऱ्यांचा सरदार जर कोणी असेल तर ते शरद पवार आहेत असा हल्लाबोल त्यांनी केला. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रातली जनता पवारांना कधीही संधी देणार नाही असेही ते म्हणाले. पवारांनी जनतेला फक्त खोटी आश्वासने दिली. त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहाणार नाही असं अमित शाह यांनी म्हटलं. 

Advertisement
Topics mentioned in this article