जाहिरात

Pankaja Munde: पवारांच्या बारामतीची पंकजा मुंडेंना भुरळ! साहेबांसमोर अजित दादांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या...

राजकारणात कट्टर विरोधक असलेल्या मुंडे आणि पवार कुटुंबीय एकत्र आल्याने या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा होत आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनीही बारामतीचे तोंडभरुन कौतुक केले. 

Pankaja Munde: पवारांच्या बारामतीची पंकजा मुंडेंना भुरळ! साहेबांसमोर अजित दादांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या...

राहुल कुलकर्णी, बारामती: बारामतीतील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषीक कृषी प्रदर्शनाचे आज ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. राजकारणात कट्टर विरोधक असलेल्या मुंडे आणि पवार कुटुंबीय एकत्र आल्याने या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा होत आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनीही बारामतीचे तोंडभरुन कौतुक केले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'मला पवार पॅक्ट कार्यक्रमांमध्ये सॉरी पावर पॅक्ट कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन खूप वेगळं वाटतंय. मला अजित पवारांबरोबर काम करण्याचा योग आला नाही. पण  माझ्या जीवनातील सकाळ कधीच एवढी छान गेली, जेवढी आज काम करण्यात गेली. नेहमी डोकं खराब करणाऱ्या बातम्या पाहण्यात जाते. आज खूप चांगली सकाळ गेली.  अशाच महिन्यातून एकदा बोलवत जावा म्हणजे इकडच्या चागल्या गोष्टी शिकता येतील, असे म्हणत पंकजा मुंडेंनी खास कौतुक केले. 

नक्की वाचा - Prithvik Pratap : नुकतंच लग्न झालेल्या पृथ्वीक प्रतापला बायकोने काढले घराबाहेर, व्हिडीओ व्हायरल

'कृषी प्रदर्शनात खूप चांगल्या गोष्टी पाहिल्या.. बारामतीत चांगला एक मोठा पशू दवाखाना व्हायला हवा.आर्टीफिशियल इंटेलिजन्स वर खूप चांगले प्रयोग इथे मी पाहिले. माझ्या भागातील दुष्काळग्रस्त भागांसाठी हा प्रयोग कसा वापरता येण्यासाठी प्रयत्न करीन.  माझ्या डिपार्टमेंटकडून काही योगदान लागल्यास अजित दादा तुम्ही शब्द टाका तो शब्दाने पूर्ण करू.  बारामतीच फक्त बारामती असू नये राज्यात अशी शहर घडावी, असंही त्या यावेळी म्हणाल्या. 

दरम्यान, यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये एका पशुवैद्यकीय रुग्णालय देण्याचीही मागणी केली. बारामतीत एक पशुवैद्यकीय महाविद्यालय द्यायचं आहे मी पंकजा मुंडे यांना बोललो. त्या म्हणाल्या दादा दोन देऊ, एक परळीला देऊ एक बारामतीला. मी म्हणालो ठीक आहे आमचं असंच असतं.. असं अजित पवार म्हणाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: