जाहिरात

Satish Bhosle News : खोक्याभोवती कारवाईचा फास आवळला; बीड पोलिसांची मोठी कारवाई

Beed Satish Bhosle news : सतीश भोसले विरोधात विविध प्रकणांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.गुन्हा दाखल होऊन चार दिवस झाले तरी खोक्या मात्र फरारच आहे.

Satish Bhosle News : खोक्याभोवती कारवाईचा फास आवळला; बीड पोलिसांची मोठी कारवाई

स्वानंद पाटील, बीड

बीड जिल्ह्यातल्या शिरुरमधील सतीश भोसले उर्फ खोक्याविरोधात पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. काही दिवसांपूर्वीच खोक्याचा घरावर वनविभागाने धाड टाकली होती. त्यावेळी खोक्याच्या घरातून वन्यजीवांच्या शिकारीचे घबाड सापडलं होतं. आता सतीश भोसले याची गाडी बीड पोलिसांनी जप्त केली आहे. सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास बीड पोलिसांनी ही गाडी जप्त केली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सतीश भोसले विरोधात विविध प्रकणांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.गुन्हा दाखल होऊन चार दिवस झाले तरी खोक्या मात्र फरारच आहे. बीड पोलिसांच्या तपास पथकाकडून खोक्याचा शोध सुरूच आहे. खोक्या लवकरच सरेंडर करणार अशी देखील माहिती मिळत आहे. 

(नक्की वाचा - Satish Bhosale: पैशांची उधळण अन् हेलिकॉप्टरने एन्ट्री, बीडमध्ये दहशत माजवणारा 'खोक्या' नेमका आहे कोण?)

Satish bhosle car

कोण आहे सतीश भोसले उर्फ खोक्या?

भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेला सतीश भोसलेचे नवनवे कारनामे आता समोर येत आहे. एका गरीब व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता त्याचा हेलिकॉप्टरने एन्ट्री केल्याचा तसेच नोटांचे बंडल गाडीच्या डॅशबोर्डवर फेकतानाचेही व्हिडिओ समोर आलेत. 

( नक्की वाचा : Maharashtra Budget 2025 : वाहतूक कोंडी सुटणार, तिसरं विमानतळ मिळणार! वाचा मुंबईकरांना काय मिळालं? )

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थाटात मिरवणारा, हॅलिकॉप्टरने एन्ट्री घेणारा तसेच नोटांचे बंडल उधळणारा हा तरुण आहे कोण? त्याच्याकडे इतके पैसे आले कुठून? असा सवाल उपस्थित होत असून यावरुनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आक्रमक भूमिका घेत सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला होता. सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: