
बीड: बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण झाल्याची बातमी समोर आली होती. अशातच आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका महिलेची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यावर पोलिसांनीही स्पष्टीकरण दिले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतोष देशमुख यांच्यावर अनैतिक संबंधांचे आरोप करण्यासाठी तयार असलेल्या महिलेची कळंब शहरातील द्वारकानगरमध्ये राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे. या महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.. असा दावा अंजली दमानियांनी केला आहे.
या महिलेची कुठल्या कारणाने हत्या झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे. बीड पोलिसांना ही बातमी कळाली अन् ते घटनास्थळी पोहोचल्यानंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलिसांना कळाली, असेही अंजली दमानियांनी म्हटले आहे.
(नक्की वाचा - Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर कुणाच्या मदतीने तेलंगणात पोहोचला? 5 जणांना नोटीस)
शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना 2 दिवसांपासून उग्र वास येत होता. पन ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला. व मृतदेह सडलेला आसल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोष्टमार्टम केले व अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, अंजली दमानियांनी केलेल्या या दाव्यावर आता बीड पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. कळंब शहरातील द्वारका नगरीत मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे म्हणत कळंब येथील महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर सुरू असलेली चर्चा पोलिसांनी फेटाळली आहे. अंजली दमानिया यांच्या आरोपानंतरही पोलिसांनी काहीही संबंध नसल्याची माहिती दिली असून मनीषा बिडवे हिच्या हत्या प्रकरणातील आरोपी जवळपास निश्चित झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
(नक्की वाचा - Shirdi News : नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ ठरणार केंद्र बिंदू, नाईट लँडिग विमानसेवा सुरू)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world