जाहिरात

खासदार सत्कारात मग्न, नागरिकांची पाण्यासाठी वणवण, बीडमध्ये काय चाललंय?

Bajarang Sonawane Beed : बीडचे खासदार सत्कार कार्यक्रमात मग्न असताना त्यांच्याच गावात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असल्याचं वास्तव उघड झालं आहे. 

खासदार सत्कारात मग्न, नागरिकांची पाण्यासाठी वणवण, बीडमध्ये काय चाललंय?
Beed Water Problem
केज, बीड:

स्वानंद पाटील, प्रतिनिधी

बीड लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानं बजरंग सोनावणे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोनावणे यांनी भाजपाच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. या विजयानंतर सोनावणे यांचा केजमध्ये सोमवारी मोठा सत्कार करण्यात आला. बीडचे खासदार सत्कार कार्यक्रमात मग्न असताना त्यांच्याच गावात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असल्याचं वास्तव उघड झालं आहे. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बजरंग सोनावणे यांचा ज्या केजमध्ये सत्कार झाला त्याच केजमध्ये बजरंग वस्ती हा भाग आहे. या भागातल्या नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून तिथल्या नागरिकांनी या संदर्भात प्रशासनाकडं पाठपुरावाही केला. मात्र, त्यांना यश मिळालं नाही. ज्या बोरवेलद्वारे या वस्तीमध्ये पाणी दिलं जातं त्या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नसल्यान नागरीकांची पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

( नक्की वाचा : 'तुम्ही जे पेरलं ते उगवलं' बजरंग सोनावणेंचा पंकजा मुंडेंवर जोरदार निशाणा )

परिसरातल्या एका खासगी बोरचे पाणी बजरंग वस्तीतील नागरिकांची तहान भागवत असल्याचं नागरिकांनी यावेळी सांगितले. पाण्याची व्यवस्था करा असं वारंवार प्रशासनाला सांगितलं मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याचं नागरिकांनी सांगितलं लहान मुलं आपल्याला हंडाभर पाणी मिळावं यासाठी धावा धाव करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.खासदारांच्या गावातच नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. 

'सत्कार समारंभात वेळ घालू नका'खासदार बजरंग सोनवणे यांचा सोमवारी केजमध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला. माजी मंत्री अशोक पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात पाटील यांनी सोनावणे यांना सुनावलं होतं.  सत्कार समारंभात वेळ घालू नका असे म्हणत त्यांनी खासदार सोनवणे यांचे कान टोचले होते.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
हैदराबादला स्वतंत्र मुस्लीम देश बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निजामानं कशी पत्करली शरणागती?
खासदार सत्कारात मग्न, नागरिकांची पाण्यासाठी वणवण, बीडमध्ये काय चाललंय?
Good news for Mumbai! You can now register property at any joint sub-registrar office
Next Article
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मालमत्तेच्या दस्त नोंदणीसाठी हद्दीची अट रद्द