जाहिरात
This Article is From May 01, 2024

महागाईत बेस्ट तिकीट दरवाढीची भर, बस भाड्यामध्ये 2 ते 3 रुपयांनी वाढ होणार?

बसचे किमान तिकीट दर आता 5 रुपयांवरुन 7 रुपये होणार आहे. बसचे किमान तिकीट दर 2 ते 3 रूपयांनी वाढणार आहेत.

महागाईत बेस्ट तिकीट दरवाढीची भर, बस भाड्यामध्ये 2 ते 3 रुपयांनी वाढ होणार?

महागाईने पिचलेल्या मुंबईकरांना आणखी एक दणका लवकरच बसण्याची शक्यता आहे. मुंबईत प्रवासांचा महत्त्वाचं माध्यम असलेल्या बेस्टच्या प्रवासी भाडे दरात वाढ होणार आहे. बसचे किमान तिकीट दर आता 5 रुपयांवरुन 7 रुपये होणार आहे. बसचे किमान तिकीट दर 2 ते 3 रूपयांनी वाढणार आहेत.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बेस्टची दर वाढ एसी बसच्या तिकीट दरांमध्येही होणार आहे. एसी बससाठी 10 किलोमीटर मागे 3 रुपयांनी तिकीटांचे दर महागणार आहेत.  मोठ्या संख्येने मुंबईकर बेस्ट बसचा वाहतूकीसाठी वापर करतात, त्यांना त्यांना हे अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. वाहतुकीचा खर्च आणखी वाढल्याने मुंबईकरांचा काय प्रतिसाद असेल हे पाहावं लागले. 

(नक्की वाचा- मुंबईतील धक्कादायक प्रकार, टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती; आईसह अर्भकही दगावलं!)

मिळालेल्या माहितीनुसार, किमान तिकीट दर आता 5 रुपयांवरुन 7 रुपये होणार आहेत. एसी बसचेही तिकीट दर वाढणार आहेत. एसी बससाठी 10 किमीमागे 3 रुपयांनी तिकीटांचे दर महागणार आहेत.  त्यामुळे वाढत्या महागाईत आता बसच्या तिकीट दरवाढीची भर पडणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com