जाहिरात

मतदार यादीतील नावासोबत मोबाईल नंबर जोडणीचा जबरदस्त होईल फायदा, प्रक्रिया सविस्तपणे जाणून घ्या

मतदारांना मतदार यादीतील आपल्या नावासोबतच स्वतःचा मोबाईल क्रमांक (Voter Card Mobile Link 2024) जोडून घेण्याची सुविधाही सुरू करण्यात आली आहे. 

मतदार यादीतील नावासोबत मोबाईल नंबर जोडणीचा जबरदस्त होईल फायदा, प्रक्रिया सविस्तपणे जाणून घ्या
मुंबई:

महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षित पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमअंतर्गत पात्र नव्या मतदारांच्या नोंदणीसह जुन्या मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलामध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्याची संधी देखील उपलब्ध आहे. यापैकी एक महत्वाची बाब म्हणजे मतदारांना मतदार यादीतील आपल्या नावासोबतच स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडून घेण्याची सुविधाही सुरू करण्यात आली आहे. 

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तंत्रज्ञान स्नेही अशा पर्यायांचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवण्याची भूमिका निश्चिंतपणे बजावते येते. म्हणूनच आपल्या मतदार यादीतील नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईतील मतदारांना येत्या 20 ऑगस्टपर्यंत मतदार यादीसोबत मोबाईल क्रमांक जोडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदार यादीतील नावासोबत मोबाईल क्रमांक जोडल्याने निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचना आणि माहिती नागरिकांना आपल्या मोबाईलवर मिळणे शक्य होणार आहे. 

निवडणूक आयोगाकडून पाठवण्यात येणाऱ्या माहितीमध्ये मतदान केंद्र, मतदानाची तारीख, मतदानाची वेळ इत्यादी महत्वाची माहिती समाविष्ट असते. मतदानाच्या दिवशी आपला वेळ वाचवण्यासोबतच, विनासायास मताधिकार बजावण्यास ही माहिती कामी येते. तसेच भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना आणि निर्देशांची माहिती प्राप्त होते. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबवले जाणारे मतदार सर्वेक्षणासारखे उपक्रम, मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्या संदर्भातील अर्जावरील कार्यवाही याबाबतच्या सूचना - नोटीसा, पंचनाम्याची सूचना (असेल तर) प्राप्त होते, आणि संभाव्य कार्यवाही सुलभ होते. 

मतदार यादीशी मोबाईल क्रमांक जोडण्याचे फायदे 

आपला मोबाईल क्रमांक अद्ययावत केल्यास, भारत निवडणूक आयोगाच्या electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळाद्वारे तसेच Voter Helpline मोबाईल अॅपद्वारे मतदार यादीतील आपल्या नावाचा सुलभतेने शोध घेता येतो.

इ - मतदार ओळखपत्र डाऊनलोड करता येते

  • पूर्वी मतदार नोंदणी व इतर सेवा ऑफलाईन स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे बहुतांश मतदार ओळखपत्रधारकाचे मोबाईल क्रमांक जोडलेले नाहीत. त्यामुळे आपल्या नावासोबत आपला मोबाईल क्रमांक जोडल्याची खात्री करणे शक्य आहे. 
  • पूर्वी मतदार नोंदणी व इतर सेवा ऑफलाईन स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे अनेकदा ऑनलाईन पद्धतीत एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करून एका पेक्षा अधिक जणांचे मतदार नोंदणी अर्ज भरले जातात. अशावेळी हे टाळण्यासाठी एका मोबाइल क्रमांकाचा वापर फक्त एकाच मतदार ओळखपत्रासाठी केला जावा.
  • विद्यमान मतदारांसह ज्यांच्या मतदार यादीतील नावासोबत त्याचा विशिष्ट अर्थात युनिक मोबाईल क्रमांक जोडलेला नाही, त्यांनी अर्ज क्रमांक ८ भरावा. ही प्रक्रिया मतदारांच्या हिताची आहे.

मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्यासाठीचे पर्याय

1) नव मतदार नोंदणीचा अर्ज

नव मतदार नोंदणीचा अर्ज भरताना आपल्याला अर्जात स्वतःचा मोबाईल क्रमांक देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. इतर कोणत्याही मतदार ओळखपत्रासाठी वापरला न गेलेल्या स्वतःचा असा मोबाईल क्रमांक दिल तर तो मतदार यादीत आपल्या नावासोबत जोडला जातो. 

विद्यमान नोंदणीकृत मतदारांसाठी अर्ज क्रमांक ८ यामध्ये मतदार यादीतील वैयक्तिक तपशीलामधील बदल, दुरुस्त्या आणि अद्ययावतीकरणअंतर्गत मतदार यादीत आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्याचा पर्याय दिला आहे. हा अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाईनदेखील भरता येतो. 

2) अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा

  • ऑनलाईन अर्ज भरण्याकरता www.voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline हे मोबाईल अॅप वापरता येते.  लॉग इन केल्यावर अर्ज क्रमांक ८ निवडून त्यात Correction of Entries in Electoral Roll' या सुविधेअंतर्गत, आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्याचा पर्याय मिळतो.
  • ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयालात जाऊन, तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष शिबिरामध्येही ऑफलाईन पद्धतीने मतदार अर्ज भरू शकतील. 
  • मतदार आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांशी संपर्क साधू शकतात आणि त्यांनाही मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून देण्याची विनंती करू शकतात

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com