मुंबई: महायुती सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाची वर्णी लागणार तसेच कोणत्या पक्षाला किती, अन् कोणती खाती मिळणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. दिल्लीमध्ये अमित शहांसोबत झालेल्या बैठकीमध्ये भाजप 20, शिंदे गट 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 10 असा फॉर्म्युला फिक्स झाला आहे.
अशातच आता या मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळावी अशी भाजपच्या अनेक आमदार तसेच नेत्यांची इच्छा आहे. त्यासाठी या नेत्यांनी जोरदार फिल्डिंगही लावली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार आशिष शेलारही मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता भाजप हायकमांड काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नक्की वाचा - बसमध्ये बिघाड नाही, चालकानं मद्यपान केलं नव्हतं; कुर्ला डेपोजवळच सुरू झालं होतं अपघाताचं सत्र?
समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्री पदाचे वेध लागले आहेत. नव्या मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी दोन्ही नेत्यांनी जोरदार लॉबिंग सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे आगामी काळातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे आव्हान असताना आशिष शेलार तसेच बावनकुळेंनी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली आहे.
भाजप हायकमांड आता या दोन्ही नेत्यांच्या मागणीबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे मंत्री झाले तर त्यांच्याकडे असलेल्या पदांवर नवनियुक्ती करावी लागणार आहे. अशावेळी भाजपा प्रदेशअध्यक्ष ओबीसी की मराठा करायचा यावर भाजपा पक्ष श्रेष्ठीचे मंथन झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, माजी मंत्री रावसाहेब दानवे, संजय कुटे, गिरीश महाजन, राम शिंदे यांची नावे भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षातही भाकरी फिरवली जाणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नक्की वाचा - New RBI Governor : रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर Sanjay Malhotra कोण आहेत?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world