जाहिरात

Shirdi News: "सगळे भिकारी गोळा होतात अन् शिर्डीच्या प्रसादालयात फुकट खावून जातात", सुजय विखेंचं वादग्रस्त वक्तव्य

साईबाबा संस्थानने साई प्रसादालयात तत्कालीन विश्वस्त समितीने 2017 साली मोफत भोजन सुरु केले होते. गेल्या आठ वर्षापासून हे मोफत भोजन सेवा सुरु असून आज सुजय विखे यांनी या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Shirdi News: "सगळे भिकारी गोळा होतात अन् शिर्डीच्या प्रसादालयात फुकट खावून जातात", सुजय विखेंचं वादग्रस्त वक्तव्य

सुनील देवांगे, शिर्डी

अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे हे त्यांच्या खळबळजनक वक्तव्याने नेहमी चर्चेत असतात. आज देखील शिर्डीतील एका कार्यक्रमात त्यांनी असंच खळबळजनक वक्तव्य केलं आहे. अख्खा देश शिर्डीच्या प्रसादालयात फुकट खावून जातो. महाराष्ट्राचे सगळे भिकारी येथे गोळा झालेत, असं वक्तव्य सुजय विखे यांनी केलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात भाविकांना मोफत भोजन दिलं जातं. याविषयी बोलताना प्रसादालयातील मोफत भोजन बंद करुन ते सशुल्क करावे. शिर्डीत मोफत भोजन मिळत असल्याने अख्खा देश येथे येऊन फुकट जेवून जातात. भिकारी सगळे महाराष्ट्राचे येथे गोळा झाले आहेत, असं वक्तव्य सुजय विखे यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

साईबाबा संस्थानने साई प्रसादालयात तत्कालीन विश्वस्त समितीने 2017 साली मोफत भोजन सुरु केले होते. गेल्या आठ वर्षापासून हे मोफत भोजन सेवा सुरु असून आज सुजय विखे यांनी या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच ही मोफत भोजन सेवा बंद करुन 25 रुपये करावी अशी मागणी देखील सुजय विखे यांनी केली आहे.

(ट्रेंडिंग बातमी - Anjali Damania : दररोज 700 ते 800 धमकीचे कॉल, अश्लील कमेंट; मुंडेंच्या कार्यकर्त्यांवर मानसिक छळाचा आरोप )

नेमकं सुजय विखे काय म्हणाले?

शिर्डी परिक्रमाच्या कार्यक्रमात बोलताना माजी खासदार सुजय विखे म्हणाले की, “शिर्डी परिक्रमेच्या माध्यमातून साईबाबांच्या विचारांची प्रसिद्धी देशभरात होते. त्याबरोबरच शिर्डीच्या अर्थकारणाला चालना मिळावी असा एक संयुक्तिक मेळ घातला जात आहे. मात्र, आपल्याला भविष्यात दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. संस्थानचा खर्च हा अशा माध्यमातून व्हावा की त्या खर्चाची परतफेड या भूमीत जन्मलेल्या माणसांच्या उपजिविकेचं साधन झालं पाहिजे. आता साईसंस्थानने एक हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आज शिर्डीकरांची ती गरज नाही, कारण त्यातून येथील मुलांना रोजगार निर्मिती होणार नाही, असं सुजय विखे यांनी म्हटलं.

आपण हॉस्पिटल उभारलं पण त्यात फक्त 25 टक्के स्थानिक लाभ घेतात आणि 75 टक्के बाहेरचे लोक लाभ घेतात. त्यामुळे स्थानिकांचं जीवनमान बदलत नाही, ना स्थानिकांना रोजगार मिळतो. संस्थानचा उद्धेश हा भक्तांची काळजी घेणे आणि शिर्डीची अर्थव्यवस्था बळकट करणे आणि येथील मुलांचं भविष्य घडवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे, असंही सुजय विखे म्हणाले.

(नक्की वाचा - Share Market Fraud : शेअर मार्केटचं वेड, 4 कोटींचा नफा; सत्य समजताच उच्च न्यायालयाच्या वकिलांना बसला धक्का! )

‘महाराष्ट्रातील सगळे भिकारी येथे गोळा झालेत'

“साई मंदिरातील प्रसादालयात संस्थान मोफत जेवण देते. मात्र, जेवणासाठी 25 रुपये घेतले पाहिजेत. जेवणासाठी पैसे घेतले पाहिजेत. ते पैसे वाचले तर मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला जाईल. संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतोय. संपूर्ण महाराष्ट्रातील भिकारी या ठिकाणी गोळा झालेत. हे योग्य नाही. संस्थानने आपण काय करत आहोत? याचा विचार केला पाहिजे”, असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com