जाहिरात

BMC Election 2026: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला तडीपारीची नोटीस, अरविंद सावंत पोलिसांशी भिडले; मध्यरात्री तणाव

ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्याला वरळी पोलीस स्थानकातून तडीपारीची नोटीस दिल्याने अरविंद सावंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

BMC Election 2026: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला तडीपारीची नोटीस, अरविंद सावंत पोलिसांशी भिडले; मध्यरात्री तणाव

BMC Election 2026: मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. मुंबईमध्ये सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप होत असल्याचा, उमेदवारांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून होत आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

अरविंद सावंत- पोलिसांमध्ये बाचाबाची

मतदानाच्या आदल्यारात्री मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिका क्षेत्रात पैसे सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटल्याचे आरोप होत आहेत. यावरुनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडेही झाल्याचे पाहायला मिळाले. वरळीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि पोलिसांमध्येही मध्यरात्री जोरदार बाचाबाची झाली. ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्याला वरळी पोलीस स्थानकातून तडीपारीची नोटीस दिल्याने अरविंद सावंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

VIDEO : चेंबूरमध्ये बनावट अधिकारी अन् पैसे वाटपावरून राडा; ठाकरे गट आक्रमक, उमेदवारही भावुक

वरळीमधील  ठाकरे गटाचे पदाधिकारी आकाश सोनावणे यांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस आल्याने हा सगळा प्रकार घडला. हुकूमशाही आहे का? बेबंधशाही आहे का? पदाधिकाऱ्याची चूक काय? असा सवाल अरविंद सावंत यांनी पोलिसांना केला. काहीही गुन्हा नसताना जो ऍक्टिव कार्यकर्ता असेल त्याला उचलता का? वर्दी आहे म्हणून तुम्ही हुकूमशाही करणार का? सगळे गुलाम झालेत, असे म्हणत अरविंद सावंत पोलिसांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. 

गुन्हे दाखल असल्याने पदाधिकारी तडीपार...

दरम्यान, तडीपार करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल आहेत. वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगामी " महानगरपालिका निवडणूक २०२६ ची मतदान प्रक्रिया व मतमोजणी च्या कालावधी दरम्यान सार्वजनिक शांतता बिघडण्यास होण्याच्या दृष्टीने कलम १६३ (२) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ मधील तरतुदीनुसार आपणास प्रतिबंध करणे आवश्यक आहे, असं पोलिसांनी दिलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे. 

Nagpur Election 2026: नागपुरात राजकीय वाद टोकाला! काँग्रेस उमेदवाराचे कार्यालय जाळलं; भाजपवर आरोप

Listen to the latest songs, only on JioSaavn.com