
BMC Housing Lottery 2025: मुंबई महापालिकेने 426 घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉटरीसंदर्भातील तपशील मुंबई महानगरपालिकेतर्फे 15 ऑक्टोबर रोजी कळवण्यात आला होता. यानुसार 16 ऑक्टोबरपासून या सोडतीसाठी अर्ज विक्रीला आणि अर्ज स्वीकारण्यास सुरूवात होणार होती. मुंबईत घर व्हावं ही आस लागलेल्या लाखो नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी होती. या सगळ्यांना गुरुवारचा दिवस उजाडताच मुंबई महापालिकेने दिलेल्या वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती मिळवण्यासाठी धडपड केली. मात्र त्यांची घोर निराशा झाली, कारण ही साइट ओपनच होत नव्हती.
नक्की वाचा: मुंबई महापालिकेची 426 घरे कुठे आहेत ? किंमतही निश्चित झाली; फॉर्म भरण्यापूर्वी ही माहिती अवश्य वाचा
BMC घरासाठीची लॉटरी कधी आहे ?
नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध व्हावीत यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेला मिळालेल्या 426 घरांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी लॉटरी पद्धत वापरण्यात येणार आहे. ही सोडत प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार होती आणि लॉटरी 20 नोव्हेंबर 2025 रोजी काढण्यात येणार होती. म्हाडा किंवा सिडको ज्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवते त्याच पद्धतीने मुंबई महापालिकेनेही ऑनलाईन अर्ज मागवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉटरी संदर्भातील सगळी माहिती देखील ऑनलाईनच देण्यात येणार आहे. यासाठी https://bmchomes.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले होते.
नक्की वाचा: BMC कडून 426 घरांसाठी लॉटरी, अर्जापासून सोडतीच्या तारखेसंदर्भातील सगळी माहिती जाणून घ्या
BMC घरांसाठीच्या लॉटरीचा अर्ज कधीपर्यंत भरता येणार ?
- BMC च्या 426 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून अर्ज विक्रीला 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरूवात झाली आहे.
- या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल तर शेवटची मुदत ही 14 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल.
- BMC घरांसाठी निघणाऱ्या लॉटरीसाठी अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम 14 नोव्हेंबरपर्यंत भरता येईल.
- पात्र अर्जदारांची अंतिम यादी 18 नोव्हेंबरला संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
- BMC घरांसाठीची लॉटरी 20 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी काढण्यात येणार आहे.
- यशस्वी अर्जदार व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे दिनांक 21 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
🔹विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अन्वये प्राप्त ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 15, 2025
🔹अत्यल्प आणि अल्प गटासाठी या सदनिका उपलब्ध… pic.twitter.com/m3lTLp0UhA