जाहिरात

Buldhana News: मृत्यूनंतरही हाल.. कुत्र्यांच्या तोंडात मुलीच्या मृतदेहाचे तुकडे, सत्य समजताच अख्ख गावं हादरलं

या घटनेने परिसरात व्यक्त होत असून सामाजिक संस्थांनी अशा भटक्या कुटुंबांना प्रशासनाने योग्य मार्गदर्शन आणि मदत करावी अशी मागणी केली आहे.

Buldhana News: मृत्यूनंतरही हाल.. कुत्र्यांच्या तोंडात मुलीच्या मृतदेहाचे तुकडे, सत्य समजताच अख्ख गावं हादरलं

अमोल सराफ, बुलढाणा: अनेक वेळा भटक्या मोकाट कुत्र्यांमुळे मुख्यतः अबाल वृद्ध आणि चिमुकल्यांवर जीवघेणा प्रसंग ओढवल्याचं आपण वारंवार पाहतो . मात्र कुत्र्यांनी उकरून काढलेला बालिकेचा मृतदेह मृत्यूनंतरही नियतीचा पिछा पुरवतो त्यावेळी सर्व काही स्तब्ध होऊन जाते. अशीच  मानवतेलाही लाजवणारी रदर घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात उघडकीस आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पालवात राहणाऱ्या भटक्या समाजातील दीड वर्षाच्या चिमुकलीच्या मृत्यूनंतरही तिचा दुर्दैवाचा पिक्चर सुटला नाही प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्यानंतर रात्री पुरण्यात  आलेले तिचे प्रेत मोकाट कुत्र्यांनी उकरून काढले आणि शरीराचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली.

Virar News: विरार ट्रॅफिक पोलिसांचा धक्कादायक प्रताप! जप्त केलेली वाहने जमा न करता परस्पर.., काय आहे प्रकरण?

पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर अलीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहकर जानेफळ रस्त्यावरील पालवात राहणाऱ्या एका भटक्या कुटुंबातील दीड वर्षाच्या बालिकेची प्रकृती अचानक बिघडली तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला तातडीने हलविण्याचा सल्ला दिला मात्र उपचारापूर्वीच या चिमुकलीने रस्त्यातच अखेरचा श्वास घेतला.

भटक्या समाजातील हे कुटुंब असल्याने त्यांनी आपला शोक दाबत रात्री जानेफळ रस्त्यालगत असलेल्या महानुभाव पंथाच्या स्मशानभूमी जवळ चिमुकलीवर अंत्यसंस्कार केले तथापि खड्डा पुरेसा खोल न झाल्याने प्रेत नीट पुरले गेले नसल्याचे समोर आले आहे याच कारणामुळे रात्री उशिरा मोकाट कुत्र्यांनी तो खड्डा उकरून मृतदेह बाहेर काढला आणि शरीराचे काही भाग फाडून नेले.

Mumbai News : मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये 'WWE'! रुग्णाचा मृत्यू होताच नातेवाईकाकडून डॉक्टरांना बेदम मारहाण, Video

पहाटे परिसरातील नागरिकांनी मानवी अवयव दिसल्याने शहरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार त्यांचे पथक श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली तपासानंतर हा प्रकार कोणत्याही घात पाहता असा नसून अंत्यसंस्कार करताना खड्डा पुरेसा खोल ना खोदल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेने परिसरात व्यक्त होत असून सामाजिक संस्थांनी अशा भटक्या कुटुंबांना प्रशासनाने योग्य मार्गदर्शन आणि मदत करावी अशी मागणी केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com