महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वरिष्ठ नेता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने रविवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात पक्षाच्या नऊ उमेदवारांची घोषणा (आतापर्यंत शरद पवार गटाने 76 उमेदवारांची घोषणा केली आहे) केली. या यादीत शरद पवार गटाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून 26 वर्षीय सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी दिली आहे.
सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांची कन्या आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास निगममधील निधीच्या फेरफारचे आरोपी रमेश कदम यांची मुलगी सिद्धी कदमला तिकीट दिल्यामुळे केवळ मोहोळच नाही तर सोलापूर जिल्ह्याला धक्का बसला होता. रमेश कदम सध्या 312 कोटी आर्थिक फेरफार प्रकरणात जामीनावर बाहेर आहेत. 26 वर्षीय सिद्धी कदम या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या विद्यार्थिनी आहेत.
2019 विधानसभा निवडणुकीदरम्यान रमेश कदम तुरुंगात गेले होते, त्यावेळी सिद्धी कदम यांनी आपल्या वडिलांचा मोहोळमध्ये जोरदार प्रचार केला होता. त्यावेळी रमेश कदम यांना तुरुंगात असतानाही आणि अपक्ष उमेदवार असतानाही तब्बल 25 हजार वोट मिळाले होते. 2019 मध्ये पराभूत झालेले कदम 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर मोहोळमधून आमदार म्हणून निवडून आले होते.
नक्की वाचा - बारामतीत काका विरुद्ध पुतण्यामध्ये लढत; दोन्ही पवार आज भरणार उमेदवारी अर्ज
मिळालेल्या माहितीनुसार, संजय क्षीरसागर, राजू खरे, लक्ष्मण ढोबळे सारखे अनेक नेत्यांना मोहोळ मतदारसंघातून तिकिटाची मागणी केली जात होती. मात्र शरद पवार गटाने सिद्धी कदमला संधी दिली. त्यामुळे मोहोळ मतदारसंघात बंडखोरीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोलापूर जिल्ह्याचे मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या यशवंत माने निवडणूक लढत आहेत. माजी आमदार राजन पाटील यांनी यशवंत मानेंचं समर्थन केलं. त्यामुळे मोहोळमधून महायुतीचे उमेदवार यशवंत माने विरूद्ध महाविकास आघाडीच्या सिद्धी कदम यांच्यात रंजक लढत पाहायला मिळेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world