
लक्ष्मण सोळुंके, जालना
रुग्णाला घेऊन जात असलेली चारचाकी गाडी राजूर-टेंभुर्णी रोडवर देळेगव्हाण-गाडेगव्हाण शिवारात विहिरीत कोसळली. या अपघातात गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला आहेत. जालना जिल्ह्यातील राजूर-टेंभुर्णी रस्त्यावर हा अपघात घडला.
गेवराई गुंगी येथील डकले परिवारातील अर्धांगवायूने ग्रस्त असलेल्या रुग्णाला सुलतानपूर येथे घेऊन जात असताना हा अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच राजूर आणि टेंभुर्णी पोलीस तसेच स्थानिक नागरिक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
(नक्की वाचा- Mumbai News: मुंबईत 'टक टक गँग' पुन्हा ॲक्टिव्ह, आत्ताच्या 'कार'नाम्याने पोलिसांचे टेन्शन वाढले)
क्रेनच्या मदतीने विहिरीत कोसळलेली चारचाकी बाहेर काढण्यात आली. गाडीतील सर्वजण पाण्यात अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
(नक्की वाचा- Dombivli : अखेर डोंबिवलीतील फरार मूर्तीकार पोलिसांपुढे हजर, पळून गेल्याचं सांगितलं कारण)
पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य सुरू असून, सर्वजण इतर व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत. विहिरीतून गाडी बाहेर काढल्यानंतरच मृतांची आणि जखमींची निश्चित संख्या स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world