जाहिरात

धक्कादायक! शालेय पोषण आहारातून 80 विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरु

 शाळेचा पोषण आहार खाल्ल्यामुळे 80 विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळली असून सध्या त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विषबाधा झालेल्या मुलांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

धक्कादायक! शालेय पोषण आहारातून 80 विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरु

अभिषेक भटपल्लीपार, चंद्रपूर: शालेय पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यात घडली आहे. शाळेचा पोषण आहार खाल्ल्यामुळे 80 विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळली असून सध्या त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विषबाधा झालेल्या मुलांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामधुन विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना  सावली तालुक्यातील पारडी गावातील  जिल्हा परिषद शाळेत घडली. पारडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये 133 पटसंख्या असू घटनेच्या दिवशी 126 विद्यार्थी हजर होते. या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामध्ये उखडलेला चणा, तिखट व मिठ लावून दिलेले होते. मात्र पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने विद्यार्थ्यांना रात्रोच्या वेळेस उलटया, हगवण व ताप येणे सुरु झाले.

नक्की वाचा: मंत्रिमंडळ विस्तार ते शिंदे सोबतचे मतभेद! फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे 10 मुद्दे

विद्यार्थी शाळेत आले त्यावेळेसही विद्यार्थी उलटया करीत असल्याने काही विद्यार्थ्यांना सावलीचे ग्रामिण रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सावली येथे तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करुन विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत असले तरी या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने उपचार करण्यास अडचण निर्माण होत आहे.

दरम्यान, या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने उपचार करण्यास अडचण निर्माण होत आहे. जागेअभावी २५ विद्यार्थ्यांना मुल येथील उप जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे. 

महत्वाची बातमी: Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी सांगितला उपमुख्यमंत्रिपदाचा अर्थ, DCM म्हणजे...

Listen to the latest songs, only on JioSaavn.com