Devendra Fadnavis Oath-Taking Ceremony LIVE Updates: विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडला राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली मुंबईच्या आझाद मैदानावर हा भव्य सोहळा झाला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशभरातील भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.
शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. परस्परांमध्ये कोणतेही मतभेद असल्याचा त्यांनी इन्कार केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विशेष पत्रकार परिषद घेतली. गेली अडीच वर्ष मी मुख्यमंत्री या नात्यानं कॉमन मॅन म्हणून काम केलं आहे. आता डीसीएम म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करणार आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.
अडीच वर्षांआधी माझं नाव त्यांनी सुचवलं आणि आता मी त्यांचं नाव सुचवलं याचा मला अभिमान आहे. फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार गतिमान काम करेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
Live Update : नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करू - देवेंद्र फडणवीस
7,8,9 तारखेला विशेष अधिवेशन
खातेवाटप वेळेत पूर्ण केलं जाणार
९ तारखेला विधानसभा अध्यक्ष ठरवू
नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करू
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Live Update : आधी जे धक्के लागले होते ते यावेळी दिसणार नाहीत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विरोधकांच्या आवाजाची संख्या कमी आहे पण आम्ही त्यांच्या संख्येवर त्यांचा आवाज मोजणार नाही. त्यांचा आम्ही सन्मान राखू. आम्ही पाच वर्ष स्थिर सरकार देवू, आधी जे धक्के लागले होते ते यावेळी दिसणार नाहीत.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Live Update : रोल जरी बदलले तरी दिशा तीच, गती ही तीच, समन्वयही तोच राहणार - देवेंद्र फडणवीस
पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही तिघांनीही अधिकाऱ्यांना सांगितलं की, नीट योग्य पायाभरणी करत राज्याला पुढे न्यायचं आहे. एकनाथ शिंदे आले तेव्हा पन्नास ओव्हरची मॅच होती. नंतर 20-20 आणि आता टेस्ट मॅच आहे. नीट धोरणात्मक निर्णय घेत राज्याला पुढे न्यायचं आहे.
जरी आमची पदं बदलली असली तरी आम्ही एक आहोत. रोल जरी बदलले असले तरी दिशा तिच, गती ही तिच, समन्वयही तोच राहणार. त्यात वेगळेपण पाहायला मिळणार नाही.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Live Update : पत्रकार परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटेच
पत्रकार परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटेच आले होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील कार्यक्रमासाठी दुसरीकडे गेलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आलं.
Live Update : मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
Live Update : थोड्याच वेळात नव्या सरकारची पत्रकार परिषद...
थोड्याच वेळात नव्या सरकारची पत्रकार परिषद...
Live Update : रितेश देशमुखने ट्विट करून दिल्या फडणवीसांना शुभेच्छा..
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल श्री @Dev_Fadnavis जी यांचे हृदयपूर्वक अभिनंदन! यशस्वी कार्यकाळासाठी त्यांना असंख्य शुभेच्छा.💐 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीला मिळालेला भव्य विजय हा खऱ्या अर्थाने सुशासन, विकास आणि महाराष्ट्राच्या समस्त जनतेचा… pic.twitter.com/HXaD6gvwrm
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 5, 2024
Live Update : नितीन गडकरींकडून देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा...
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल श्री @Dev_Fadnavis जी यांचे हृदयपूर्वक अभिनंदन! यशस्वी कार्यकाळासाठी त्यांना असंख्य शुभेच्छा.💐 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीला मिळालेला भव्य विजय हा खऱ्या अर्थाने सुशासन, विकास आणि महाराष्ट्राच्या समस्त जनतेचा… pic.twitter.com/HXaD6gvwrm
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 5, 2024
Live Update : 'यंदा विधिमंडळात शक्य नसले तरी विधिमंडळाबाहेर...'; शपथविधी सोहळ्यानंतर राज ठाकरेंचं पहिलं ट्विट
आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन.
— Raj Thackeray (@RajThackeray) December 5, 2024
२०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस…
Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ट्विटरवर केला बदल
Live Update : फडणवीसांचा शपथविधी, अदाणी समूहाच्या प्रणव अदाणी यांची उपस्थिती
Pranav Adani | फडणवीसांचा शपथविधी, अदाणी समूहाच्या प्रणव अदाणी यांची उपस्थिती | ndtv मराठी #PranavAdani #MahrashtraCMOathCeremony #NDTVMarathi pic.twitter.com/sPQRhtvixo
— NDTV Marathi (@NDTVMarathi) December 5, 2024
Live Update : देवा भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, राज्यभरात आनंदोत्सव
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पुण्याच्या इंदापूर शहरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. यावेळी देवा भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भारतीय जनता पार्टीचा विजय असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो एकच वादा अजित दादा अशा घोषणाही देण्यात आल्यात.
Live Update : काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांच्याकडून मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा
राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून @Dev_Fadnavis जी यांनी शपथ घेतली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा! राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून @mieknathshinde जी आणि @AjitPawarSpeaks जी यांनी शपथ घेतली त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन व शुभेच्छा! नवीन सरकारच्या हातून महाराष्ट्राची प्रगती…
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 5, 2024
Live Update : एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ..
एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ..
Live Update : मी शपथ घेतो की...; देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
मी शपथ घेतो की...
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
Live Update : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घेतली शपथ
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घेतली शपथ
Live Update : राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात
Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच सोहळ्याच्या ठिकाणी आगमन, थोड्याच वेळात शपथविधी कार्यक्रम सुरू होईल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच सोहळ्याच्या ठिकाणी आगमन, थोड्याच वेळात शपथविधी कार्यक्रम सुरू होईल
Live Update : महाराष्ट्राच्या पदनियुक्त मुख्यमंत्र्यांचं आगमन
महाराष्ट्राच्या पदनियुक्त मुख्यमंत्र्यांचं आगमन
Live Update : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा LIVE
Live Update : शपथविधीसाठी सलमान खानचीही उपस्थिती
#WATCH | Actor Salman Khan attends the oath ceremony of the Maharashtra government at Azad Maidan in Mumbai
— ANI (@ANI) December 5, 2024
(Video source: ANI/ DG-IPR) pic.twitter.com/Pf58D9QCfZ
Live Update : भव्य शपथविधी सोहळ्यात देशाचे दोन स्टार एकाच फ्रेममध्ये...
Live Update : वड़िलांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिविजाचा खास लुक
Live Update : आईच्या आशीर्वादाने नव्या पर्वाचा आरंभ... - देवेंद्र फडणवीस
मायेचे औक्षण!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 5, 2024
आईच्या आशीर्वादाने नव्या पर्वाचा आरंभ...#Maharashtra #Mumbai #OathCeremony pic.twitter.com/oayX9xcF4a
Live Update : अमित शाह शपथविधी सोहळ्याच्या व्यासपीठावर दाखल...
अमित शाह शपथविधी सोहळ्याच्या व्यासपीठावर दाखल...
Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मुंबईत दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मुंबईत दाखल, थोड्याच वेळात आझाद मैदानावर असतील. त्यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळ्याची सुरुवात होईल...
Live Update : शाहरुख खानचंही कार्यक्रमाच्या स्थळी आगमन...
Live Update : सचिन तेंडुलकरचं आणि त्याच्या कुटुंबीयांचं अमृता फडणवीसांकडून स्वागत
Live Update : अभिनेते रणबीर कपूर, रणवीर सिंह देखील देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित...
अभिनेते रणबीर कपूर, रणवीर सिंह देखील देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित...
Live Update : आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्याच्या स्थळी संगीत दिग्दर्शक अजय-अतुल यांच्या गाण्याच्या कार्यक्रम
आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्याच्या स्थळी संगीत दिग्दर्शक अजय-अतुल यांच्या गाण्याच्या कार्यक्रम सुरू आहे...
Live Update : सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली आणि लेक सारासह शपथविधी सोहळ्याला उपस्थित...
सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली आणि लेक सारासह शपथविधी सोहळ्याला उपस्थित...
Live Update : एकनाथ शिंदेंच्या वाहनांचा ताफा वर्षावरुन रवाना...
एकनाथ शिंदेंच्या वाहनांचा ताफा वर्षावरुन रवाना... ते आझाद मैदानाच्या दिशेने निघाल्याची माहिती...
Live Update : देवेंद्र फडणवीस शपथविधीसाठी रवाना
देवेंद्र फडणवीस शपथविधीसाठी रवाना झाले आहेत. देवगिरी बंगल्यावरून अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल थोड्याच वेळात बाहेर पडतील..
Live Update : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडून नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा...
देवेंद्र फडणवीसांकडून फोन आला होता. त्यांना शुभेच्छा दिला. महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकरिता काम करावं. - पृथ्वीराज चव्हाण
Live Update : शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी गोमातेचं पूजन केलं
|| सर्वे देवा: स्थिता देहे सर्वदेवमयी हि गौ: || 🙏
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 5, 2024
शपथविधीपूर्वी 'राज्यमाता', सर्वदेवमयी गोमातांचे पूजन करून आशीर्वाद प्राप्त केले...#Maharashtra #Mumbai #OathCeremony pic.twitter.com/7mW2ptthUv
Live Update : महायुतीचे सरकार गौमातेच्या आशीर्वादानेच, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं वक्तव्य
आज राज्य सरकारचा शपथविधी पार पडत आहे आणि याच शपथविधीवर ज्योतिर्ममठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या सरकारला आमचा नाही तर गौ मातेचा आशीर्वाद आहे. आम्ही या राज्यात गौ मातेसाठी आंदोलन केले होते. आम्ही देशभरातील मुख्यमंत्र्यांना गोमातेसंदर्भात आवाहनही केले होते आणि त्या आवाहनाला फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद देत गोमातेच्या बाजूने एक चांगला निर्णय घेतला होता. आज महायुतीचा विजय हा गौमातेच्या आशीर्वादानेच झाला असल्याचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले आहेत.
Amruta Fadnavis Speech: फडणवीसांच्या संयमामुळे ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री: अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीस सहाव्यांदा आमदार आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. महायुतीची नवी वाटचाल सुरु होत आहे, मला खूप आनंद होत आहे, त्यासोबतच जबाबदारीही वाढली आहे. त्यांनी आपल्या कामाचे चीज करुन दाखवलं आहे.
Nitiin Gadkari News: नितीन गडकरी मुंबईमध्ये दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक बडे नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार असून सध्या मुंबईमध्ये नेते दाखल व्हायला सुरुवात केली आहे.
Shivsena Leaders Meet Devendra Fadnavis: शिवसेनेचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजप नेत्यांच्या वर्षावरील भेटीनंतर आता शिवसेनेचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहे. उदय सामंत, भरत गोगावले, राहुल शेवाळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Amit Shah Mumbai: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास उरले असून देशभरातील भाजपा नेते मुंबईत दाखल होत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही मुंबईत दाखल झाले असून ते सह्याद्री अतिथी गृहावर जाणार आहेत.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार की नाही? हा संभ्रम संपला आहे. शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबाबतचं पत्र राजभवनात गेलं आहे. त्यामुळे आता शिंदे उपमुख्यमंंत्रिपदाची शपथ घेणार हे स्पष्ट झालं आहे.
शपथविधी सोहळ्याआधी मोठा ट्विस्ट! एकनाथ शिंदे अजूनही नाराज?
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याआधी राज्याच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे हे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. शिवसेनेचे काही नेते एकनाथ शिंदे यांना भेटायला जातील. उपमुख्यमंत्री पदासाठी तुम्ही तुमचा होकार जाहीर करावा ही मागणी केली जाईल. आत्ताच उदय सामंत यांनी जर एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नाही तर एकही सदस्य शपथ घेणार नाही, असं ते म्हणालेत.
Mahayuti News: निमंत्रण पत्रिकेवरुन महायुतीत गोंधळ, एकनाथ शिंदेंचे नाव नाहीच, शपथ घेणार का?
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असतानाच आता सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरुन मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गटाच्याही निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचे नाव टाकले नाही. त्याुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला 300 संतांची उपस्थिती
आजच्या शपथविधी सोहळ्याला 300 संत मंचावर उपस्थित असतील. पंतप्रधान कार्यालयाला विनंती करून भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही व्यवस्था केली आहे. आधी पंतप्रधान कार्यालयाने या संदर्भामध्ये आक्षेप नोंदवले होते परंतु देवेंद्र फडणवीस यांनी विनंती करुन या संतांना आमंत्रित केले आहे.
Mahayuti Shapathvidhi: महायुतीच्या शपथविधीला देशभरातील 400 संत, महात्म्यांची उपस्थिती
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास उरले असून राजधानी मुंबईमध्ये अनेक बडे नेते दाखल होत आहेत. आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातून 400 संत महात्म्यांना बोलवण्यात आलेले आहे वेगवेगळे पंथ आणि पद्धतीचे उपासक या मेळाव्यासाठी आलेले आहेत त्यातले काही लोक हे व्यासपीठावरती बसणारे काही खाली बसणार आहेत.
शपथविधी सोहळ्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन; पाहा फोटो
Ambadas Danve Congrats To Devendra Fadnavis: अंबादास दानवेंकडून देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन; 10 मोठ्या मागण्या केल्या
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. तसेच अंबादास दानवे यांनी यावेळी फडणवीस यांच्याकडे 10 मोठ्या मागण्या केल्या आहेत. विरोधी पक्ष म्हणून मराठवाड्यासाठी काही माफक अपेक्षा त्यांच्याकडून असतील... पक्षभेद, द्वेष बाजूला ठेवून हे मराठवाड्याला मिळेल ही अपेक्षा, असं त्यांनी म्हटले आहे.
देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून @Dev_Fadnavis आज शपथ घेत आहेत. त्यांचे अभिनंदन! विरोधी पक्ष म्हणून मराठवाड्यासाठी काही माफक अपेक्षा त्यांच्याकडून असतील... पक्षभेद, द्वेष बाजूला ठेवून हे मराठवाड्याला मिळेल ही अपेक्षा..
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 5, 2024
१. जायकवाडी धरणाच्या…
Devendra Fadnavis Siddhivinayak Darshan: देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, मुंबादेवीलाही जाणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज देवेंद्र फडणवीस शपथ घेतील. त्याआधी ते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार आहेत, त्यानंतर ते मुंबादेवीचे दर्शन घेतील.
Devendra Fadnavis: शपथविधी आधी मोठी घडामोड! देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना फोन
महायुतीचा शपथविधी अवघ्या काही तासांवर आला असतानाच महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फोन केल्याचे सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना शपथविधी सोहळ्याला हजर राहण्याचे आमंत्रण दिल्याचे सांगण्यात येत आहे.
Potential ministers List Of Shivsena Shinde Group: मोठी बातमी: शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी समोर!
महायुतीमध्ये आज एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा तिघांचाच शपथविधी होणार आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री वगळता आज कुणाचाही शपथविधी होणार नाही असं शिवसेनेच्या नेत्यांना सांगण्यात आले आहे. दोन दिवसांनी म्हणजेच सात डिसेंबर रोजी इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार असून त्यापैंकी शिंदेंच्या शिवसेनेतील संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.
- उदय सामंत
- दादा भुसे
- शंभूराज देसाई
- गुलाबराव पाटील
- संजय राठोड
- अर्जुन खोतकर
Mumbai Airport charter Parking: राजधानी मुंबईत VVIP गर्दी; चार्टर विमान पार्किंग झाले Full
Mumbai News:
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातून बडे नेते आज मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. भारतीय जनता पक्षाकडून देशभरातील 21 राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या सोहळ्यांचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर आज 27 पेक्षा जास्त खासगी चार्टर विमान उतरणार आहेत. चार्टर विमानातून व्हीआयपी नेत्यांची रेलचेल राहणार असून विमानतळावर चार्टर पार्किंगसाठी जागाच नाहीय.
Mahayuti Oaths Ceremony: महायुतीच्या शपथविधीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचीही गैरहजेरी
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. मात्र यांपैकी कोणीही शपथविधी सोहळ्याला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांनी वैयक्तिक कारणामुळे शपथविधी सोहळ्याला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Mahayuti Government Cabinet Expansion: मोठी बातमी! 7 डिसेंबर रोजी 30 हून अधिक नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
महायुती सरकारच्या आजच्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा तिघांचाच शपथविधी होणार आहे. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्यामध्ये 30 हून अधिक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी नेते अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Ajit Pawar News: अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर नेत्यांची मोठी गर्दी
महायुतीचा महाशपथविधी सोहळा आज पार पडत आहे. आज सकाळपासूनच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर सकाळपासूनच नेत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आशुतोष काळे, अनिल पाटील, दत्ता भरणे देवगिरीवर दाखल झाले आहेत.
Mahayuti Hordings In Mumbai: महायुतीचा 'महा'शपथविधी! मुंबईभर झळकले स्वागत अन् शुभेच्छांचे बॅनर
महायुतीच्या भव्य शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सर्वत्र महायुतीच्या नेत्यांचे भलेमोठे होर्डिंग्स तसेच झेंडे पाहायला मिळत असून ठिकठिकाणी लागलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतांच्या बॅनर्सनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
#WATCH | Posters of Maharashtra CM-designate Devendra Fadnavis, Shiv Sena chief Eknath Shinde and NCP chief Ajit Pawar cover the area around Azad Maidan in Mumbai. Posters of Prime Minister Narendra Modi and Union Minister-BJP chief JP Nadda also seen.
— ANI (@ANI) December 5, 2024
Devendra Fadnavis will… pic.twitter.com/N5YkhTVIUw
Maharashtra Politics: महायुतीच्या शपथविधीला महंतांना विशेष निमंत्रण; सागर बंगल्यावर गर्दी
मुंबईच्या आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे... या रंगणार्या ऐतिहासिक सोहळ्यात, राज्य शासनानं त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या अनेक साधू-संतांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे... त्यात रामकृष्ण महाराज लहवितकर, महंत भक्तिचरणदास, महंत गणेशानंद सरस्वती, महंत रमणगिरी महाराज, माधवदास राठी, ह.भ.प. संजय धोंडगे, महंत सुधीरदास पुजारी, स्वामी संविदानंद सरस्वती, कांचनताई जगताप अशा मान्यवरांचा समावेश आहे. तसंच महंत डाॅ. अनिकेतशास्त्री देशपांडे यांचं नाव या यादीत विशेष उल्लेखनीय आहे. हे सर्व महंत आज पहाटेच्या सुमारास नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. तसेच सागर बंगल्यावरही महंत येण्यास सुरुवात झाली आहे.
महायुतीच ठरलं! आज फक्त तिघांचा शपथविधी
महायुतीच्या शपथविधीबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आज देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडणार आहे. आज फक्त तिघांचाच शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Mahayuti Government Formation: महायुतीचा शपथविधी सोहळा: दक्षिण मुंबईमध्ये वाहतुकीत मोठे बदल
राज्यात स्थापन होणाऱ्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आझाद मैदानात होत असून त्यानिमित्त आझाद मैदान व नजीकच्या परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत लागू नियम लागू असतील.
यावेळी आझाद मैदान परिसरात वाहने उभी करण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांनी रेल्वेने प्रवास करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. आवश्यकतेनुसार पालिका मार्ग- सीएसएमटी जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) दरम्यान दोन्ही मार्गिका बंद ठेवण्यात येतील. तसेच विरुद्ध दिशेने जणाऱ्या वाहनांसाठी महात्मा गांधी मार्गही आवश्यतेनुसार बंद ठेवण्यात येईल
शपथविधीच्या अनुषंगाने आझाद मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व अतिमहत्त्वाचे व्यक्ती येणार असल्यामुळे सामान्य नागरिकांनी आझाद मैदान व छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसएमटी) येथून प्रवास करताना योग्य नियोजन करावे, तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा.
हजारीमल सोमानी मार्गावरील वाहतूक चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) ते सीएसएमटी जंक्शनवर वाहतूक प्रतिबंधित असेल. पर्यायी व्यवस्था म्हणून चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) हुतात्मा चौक - काळा घोडा, के. दुभाष मार्ग - शहिद भगतसिंग मार्गाचा वापर करावा. तसचे प्रिन्सेस स्ट्रिट पूल (मेघदूत पूल) (दक्षिण मार्गिका) (एन. एस. रोड, तसेच सागरी किनारा मार्गाने श्यामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येईल. येथून जाणारी वाहने एन. एस. रोड मार्गे वळविण्यात येतील. शिवाय रामभाऊ साळगांवकर रोड (एक दिशा मार्ग) व इंदु क्लिनिक जंक्शन (सय्यद जमादार चौक ते व्होल्गा चौक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दुहेरी मार्गिका दुपारी १२.०० वा. ते रात्री आठपर्यंत खुली असेल.
Anil Bonde News: मंत्रिपदासाठी भाजप नेत्याची आराधना, त्रिवेणी घाटावर केली गंगाआरती
भाजपला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालय, अमरावती जिल्ह्यात पाच जागा जिंकत भाजपने विरोधी पक्षाचा सफाया केलाय... खासदार अनिल बोंडे यांच्या परिश्रमामुळे भाजपला हे यश मिळालंय, त्यामुळे अनिल बोंडे यांना भाजपने मंत्रीपद द्यावे, यासाठी ऋषिकेशच्या त्रिवेणी घाटावर तरुणाईकडून गंगाआरती करण्यात आलीय.. अमरावतीतल्या शेकडो तरुणाईचा या गंगाआरतीमध्ये सहभाग पाहायला मिळाला.
Devendra Fadnavis Oath-Taking Ceremony Guest List: PM मोदी- अमित शहांसह 6 राज्याचे मुख्यमंत्री; महायुतीच्या शपथविधीला दिग्गजांची उपस्थिती
राज्यात महायुती सरकार स्थापन होत असून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला देशभरातील भारतीय जनता पक्षाचे जनते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्रीपूरा मुख्यमंत्री माणिक सहा, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्पक सिंग धामी, अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खंडू, आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला, मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य, ब्रिजेश पाठक, प्रवीण तोगडिया, राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय कुमार रूपानी आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
Thackeray Group Banner: महायुतीचा शपथविधी, ठाकरे गटाकडून बॅनरबाजी
महायुती सरकारचा आज शपथविधी पार पडणार आहे. आज महायुतीचा शपथविधी सोहळा आणि पंतप्रधान मुंबईत असताना शिवसेना ठाकरे गटाकडून ईव्हीएम च्या मुद्द्याला घेऊन बॅनरबाजी करण्यात आली आहे. इतर प्रगत देशांमध्ये ईव्हीएम बॅन असताना आपल्याच देशात ईव्हीएमचा हट्ट का ? असा सवाल या बॅनर मधून उपस्थित करण्यात आला आहे."देवा शपथ" घेताय पण "देवा शपथ" सांगा ईव्हीएम च गौडबंगाल काय? शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांच्याकडून वांद्रे परिसरात ही बॅनर बाजी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याची वेळ
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी संध्याकाळी 5.30 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे.
4000 हजारहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल 4 हजारहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.
पंतप्रधान मोदींसह 40,000 लोक शपथविधी सोहळ्यासाठी राहणार हजर : प्रसाद लाड
भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे 40,000 हजारहून अधिक पाहुणेमंडळी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नऊ ते 10 केंद्रीय मंत्री, 19 मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कार्यक्रमास उपस्थिती दर्शवणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला PM मोदी राहणार उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि महायुतीतील पदाधिकारी-कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.