जाहिरात
This Article is From Dec 16, 2024

डावलले काय अन् फेकलं काय..; छगन भुजबळ संतापले, जरांगेंचे नाव घेत अजित पवारांना डिवचले

मंत्रिमंडळ विस्ताराआधी पक्षाच्या बैठकीलाही हजर  न राहिल्याने छगन भुजबळ हे नाराजी उघड झाली होती, यावरुनच आता स्वतः छगन भुजबळ यांनी स्वतः स्पष्टीकरण देत महत्वाचे विधान केले आहे. 

डावलले काय अन् फेकलं काय..; छगन भुजबळ संतापले, जरांगेंचे नाव घेत अजित पवारांना डिवचले

नागपूर: राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अन् नव्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर महायुतीमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे माजी मंत्री, ओबीसी नेते छगन भुजबळ हे नाराज असून त्यांचे समर्थकही आक्रमक झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराआधी पक्षाच्या बैठकीलाही हजर न राहिल्याने छगन भुजबळ हे नाराजी उघड झाली होती, यावरुनच आता स्वतः छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून जाहीरपणे संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

'होय मी नाराज आहे.  मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलंल काय, फेकलं काय काय फरक पडतो? मला मंत्रिपदे किती आली किती गेली. छगन भुजबळ संपला नाही. माझे बॅनरवरही फोटो नाहीत, चांगली गोष्ट आहे. कधी कधी जागा नसते बॅनरवर. मी कालपासून अजित पवारांसोबत काहीही चर्चा केली नाही. मला त्याची गरजही वाटत नाही, असे म्हणत छगन भुजबळांनी थेट अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

जरांगेंना अंगावर घेतलेल्याचं बक्षीस...

तसेच ओबीसी लढ्यामुळेच महायुतीला मोठे यश आले.  मनोज जरागेंना अंगावर घेतल्याचे बक्षीस मला मिळालं.  मी माझ्या कार्यकर्त्यांशी, समता परिषदेच्या नेत्यांशी चर्चा करेन, त्यानंतर पुढे काय ते ठरवेन, असं छगन भुजबळ म्हणालेत. त्याआधी भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना होय मी नाराज आहे, काहीही बोलणार नाही, असं उत्तर दिले होते. तसेच तुम्ही वरिष्ठांशी याबाबत बोलला आहात का? या प्रश्नावर त्यांनी कोण वरिष्ठ? असे म्हणत संताप व्यक्त केला होता.

दुसरीकडे,  छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने  ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. आज सिंदखेडराजा येथे ओबीसी समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढत नागपूर पुणे या महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा निषेध करत सिंदखेडराजा येथे मोर्चा काढून रास्ता रोको करण्यात आला आहे. 

(नक्की वाचा- "ठाकरे ब्रँड आणि तुम्ही अजुनही शेंबडे", निलेश राणेंच्या ट्वीटला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर)

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com