
छत्रपती संभाजीनगर: पावसाचा फटका, गडगडले दर आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील बळीराजा चिंतेत आहे. त्यामुळेच राज्यभरात शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगरमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. वडिलांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्यानंतर आता मुलानेही आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वडिलांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्यानंतर याच कर्जाचा भार सोसवेना नसल्याने पाच महिन्यानंतर मुलानेही आपलं आयुष्य संपवले असल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात समोर आली आहे. मयूर रामलाल राठोड असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मयुरा राठोड या तरुण शेतकऱ्याने बुधवारी सायंकाळी सहा वाजता सोयगाव तालुक्यातील निंबायती येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. रामलाल राठोड यांच्यावर खासगी बँकेचे 3 लाखांचे कर्ज होते. शेतीतून उत्पन्न होत नसल्याने त्यांनी कर्जास कंटाळून पाच महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर राठोड यांच्या कुटुंबाची जबाबदार मयूरवर आली. आधीच कर्जाचा डोंगर, त्यातच दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत तो होता. हा ताण असह्य झाल्याने त्याने बुधवारी वडिलांनी गळफास घेतलेल्या घरातच गळफास घेतला.
(नक्की वाचा: OLA, Uber : ओला, उबेरचं भाडं दुप्पट होणार, सरकारनं दिली परवानगी! वाचा काय आहेत नियम?)
शेतकरी आत्महत्यांची चिंताजनक आकडेवारी!
दरम्यान, राज्यात जानेवारी ते मार्च 2025 अखेरपर्यंत शेतकरी आत्महत्यांची 767 प्रकरणे निदर्शनास आल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. त्यापैकी 373 प्रकरणे शासन निर्णयामधील निकषानुसार पात्र ठरली आहेत. तर 200 प्रकरणे अपात्र ठरली आहेत. तसेच 194 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पात्र 373 प्रकरणांपैकी ३२७ प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आलेली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world