
मुंबई: पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय ‘ऑपरेशन सिंदूर' द्वारे कठोर प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैनादलाच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपकडून राज्यभरात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज मुंबईमध्ये भाजपची तिरंगा रॅली पार पडली. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही उपस्थित होते. ऑगस्ट क्रांती मैदान ते स्वराज्य भूमी, गिरगाव चौपाटी'पर्यंत निघालेल्या या रॅलीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी भारतीय लष्कराच्या कामगिरीला सॅल्यूट केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
"सुनले बेटा पाकिस्तान, बाप हैं तेरा हिंदुस्तान! आज तिरंगा यात्रेच्या माध्यमातून देशाच्या सैन्य दलाचे आभार माणण्यासाठी आम्ही सगळे एकत्र झालो आहोत. सिंदूरच्या माध्यमातून दाखवून दिलं की आम्ही झुकणारे नाही, पहलगाममध्ये आमच्या बांधवांना धर्म विचारून मारण्यात आले. असे हत्याकांड जगाच्या इतिहासात पाहायला मिळालं न्हवते. प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर लाँच केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच "त्या देशाला नेस्तनाबूत करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले. भारतीय सैन्याने 9 अड्डे पाकिस्तानमध्ये घुसून उध्वस्त केले. कसाबने जिथे प्रशिक्षण घेतलं त्याला ही उडवले. 9 हल्ले जे आम्ही केले त्याचं महत्व म्हणजे पाकिस्तानमध्ये पंजाब प्रांतात त्यांना वाटायचं भारतीय सेना घुसू शकत नाही. नेमकं तिथेच जाऊन भारतीय सेनेन ठोकले. पाकिस्तानने केलेला एकही हल्ला यशस्वी झाला नाही. ड्रोन, मिसाईल सर्व हाणून पाडले, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आम्ही झुकणार नाही," असा थेट इशाराही दिला.
(नक्की वाचा- Bhushan Gavai : न्यायमूर्ती भूषण गवई 52 वे सरन्यायाधीश, घेतली पदाची शपथ)
काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
"या देशावर तिरंग्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित देशभक्त आहेत. आजची रॅली भारतीय सैन्य दलाच्या शौर्यासाठी समर्पित करणारी आहे. विरतेचा शौर्यचा सन्मान करणारी ही रॅली आहे. पाकिस्तानला धडा शिकवणार ऑपेरेशन सिंदूर ज्यांनी सुरु केलं ते नरेंद्र मोदी यांचं मी अभिनंदन करतो. आतंकवाद्यांनी घेतलेल्या बळींचा बदला,चीड, सूड सगळं ओळखून नरेंद्र मोदी यांनी ऑपेरेशन सिंदूरच्या माध्यमातून उत्तर दिले," असे म्हणत एकनाथ शिंदेंनी सैन्याच्या कामगिरीचे कौतुक केले.
"आतापर्यंत कधीही ऍक्शनला रीएक्शन कोणीही घेतली नाही. 26/11 ला देखील राज्य कर्त्यांनी हिम्मत दाखवली नाही.... पण आता नरेंद्र मोदी यांनी ही हिम्मत दाखवली. बाप बाप होता हैं... पाकिस्तानला बाप कोण असतो हे दाखवण्याच काम लष्कराने दाखवून दिले. पाकिस्तानने उलटं काम केलं आणि सिसफायर असून देखील औकात दाखवली, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहिले," असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
नक्की वाचा - Justice BR Gavai : देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, भावी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आईंची मोठी मागणी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world