माजी मंत्री आणि आमदार डॉ. नितिन राऊत यांच्या कारला अपघात झाला आहे. नागपुरच्या ऑटोमोटीव्ह चौकात ही घटना घडली. प्रचारसभा आटोपून नितीन राऊत दुसरीकडे निघाले होते. त्यावेळी मागून येणारा ट्रक कारच्या उजव्या बाजूला घासत गेला. दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. यामागे घातपात असल्याचा संशय काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. नितीन राऊत कारच्या डाव्या बाजूला बसले असल्याने त्यांना काही त्रास झाला नाही. ते सुरक्षित आहेत. मात्र निवडणूक काळात ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
नक्की वाचा - तुतारी पिपाणी कन्फ्युजनवर उल्हासनगरच्या उमेदवाराची नामी शक्कल; मतविभाजनाची डोकेदुखी टळली!
सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच एका राजकीय नेत्यासोबत असला प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. नागपूर उत्तरचे उमेदवार नितीन राऊतही काल प्रचारासाठी घराबाहेर पडले होते. दिवसभ जोरदार सभा सुरू होत्या, रात्री शेवटी प्रचार आटोपून घरी जात असताना नितीन राऊत यांच्या कारसोबत हा प्रकार घडला. एक आयशर ट्रक मागून येऊन घासत गेल्याने हा अपघात घडला आहे. ही घटना 13 नोव्हेंबर रोजी रात्री घडली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world