जाहिरात

Akola News : चोरट्यांनी घर साफ केलं; घरमालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Akola News : अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे ही घटना घडली आहे. 65 वर्षीय अशोक नामदेवराव बोळे असं या मृतक व्यक्तीचे नाव आहे.

Akola News : चोरट्यांनी घर साफ केलं; घरमालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

योगेश शिरसाठ, अकोला

घरात चोरी झाल्याची घटना समजल्यानंतर घर मालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे ही घटना घडली आहे. 65 वर्षीय अशोक नामदेवराव बोळे असं या मृतक व्यक्तीचे नाव आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक बोळे यांच्या घरात काल शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्याने सोन्याचे दागिन्यांसह काही रोख रक्कम लंपास केली. चोरट्यांना एकूण 4 ते 5 लाख रुपयांचा मुद्देमाल घरातून चोरी केला.

(नक्की वाचा-  Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी)

चोरीच्या घटनेनंतर नागरिकांनी अशोक बोळे यांना घटनेबद्दल कळवलं. घरात चोरी झाल्याचं कळताच त्यांनी घराकडे पळ काढला. मात्र वाटेतच त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. गावकऱ्यांनी त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत त्यांचं निधन झालं होतं. 

(नक्की वाचा- कलिंगड विक्रीच्या आड लहान बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा; एका चुकीमुळे आरोपीचं बिंग फुटलं)

मन हेलावणाऱ्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या संदर्भात अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी पंचनामे करून तपास सुरू केला आहे. आता या चोरट्यांना पकडण्याचा आव्हान पोलिसांसमोर आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: