जाहिरात

Delhi Student Suicide: शाळेतल्यांनी हे करायला भाग पाडलं, सांगलीच्या लेकराने दिल्ली मेट्रो स्टेशनवर दिला जीव

Delhi Student Suicide: दिल्लीतील राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून उडी मारून आत्महत्या केली. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीने त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं आणि पोलिसांनी माहिती दिली. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Delhi Student Suicide: शाळेतल्यांनी हे करायला भाग पाडलं, सांगलीच्या लेकराने दिल्ली मेट्रो स्टेशनवर दिला जीव
"Delhi Student Suicide: सांगलीतल्या मुलाने दिल्लीमध्ये मेट्रोखाली दिला जीव"
Canva

Delhi Student Suicide: दिल्लीतील एका प्रतिष्ठित शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने कथित स्वरुपात शिक्षकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आलंय. मृत विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी लोकांनी दिल्लीत कँडल मार्च काढत शाळेबाहेर निदर्शनंही सुरू केली आहेत. आत्महत्या करणारा विद्यार्थी मूळचा महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील रहिवासी होता. 16 वर्षीय विद्यार्थ्याने मंगळवारी (18 नोव्हेंबर 2025) दिल्लीतील राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून उडी मारून आत्महत्या केली. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीने त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं आणि पोलिसांनी माहिती दिली. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 

"माझ्या मुलाचा मानसिक छळ करायचे"

गेल्या काही महिन्यांपासून मुलगा शाळेमध्ये मिळणाऱ्या वाईट वागणुकीचा सामना करत होता, असा आरोप मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी केलाय. त्याचे वडील पुढे असंही म्हणाले की, "तो मला आणि माझ्या पत्नीला सांगायचा की शिक्षक त्याला प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवरुन ओरडायचे आणि त्याला मानसिक त्रास द्यायचे. आम्ही कित्येकदा तोंडी तक्रारही केली, पण त्यांनी ऐकले नाही. तसेच दहावीच्या परीक्षा जवळ येत असल्याने शाळा बदलण्याचाही निर्णय टाळला. त्याची परीक्षा एक दोन महिन्यांत सुरू होणार होती. 20 गुण शाळेतर्फे मिळतात. मला कोणत्याही अडचणी नको होत्या. आम्ही मुलाला आश्वासन दिलं होतं की परीक्षा संपल्यानंतर दुसऱ्या शाळेत अ‍ॅडमिशन करू"

सुसाइड नोटमध्ये शिक्षकांवर मानसिक छळाचा आरोप

मृत मुलाच्या बॅगमध्ये पोलिसांना दीड पानांची सुसाइड नोट मिळाली. नोटमध्ये त्यानं शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. सुसाइड नोटमध्ये त्यानं लिहिलंय की, "शाळेनं इतकं काही बोललंय की मला हे करण्यास भाग पाडलंय... शाळेच्या शिक्षिका तशाच आहेत, काय बोलू...चिठ्ठीत त्याने पालकांसह भावाची माफी मागितलीय. त्याने लिहिलंय की,"माझ्या पालकांनी खूप काही केले... मला माफ करा... मी त्यांना काहीही देऊ शकलो नाही. कोणाला आवश्यकता असेल तर माझे अवयव दान करा."

सुसाइड नोटमधील आरोपांच्या आधारे पोलिसांनी शाळेच्या प्राध्यापिकेसह चार शिक्षकांविरोधात मानसिक छळाचा गुन्हा दाखल केलाय. अपराजिता पाल, मन्‍नू कालरा, युक्ति महाजन, जूली वर्गीस या चार जणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.  

सुसाइड नोट मुलानं काय लिहिलंय.... हृदय पिळवटून टाकणारी माहिती

"जे कोणी हे वाचतयं, माझं नाव.... आहे. 991159XXXX या क्रमांकावर कॉल कराल प्लीज. मला फार दुःख आहे की मी हे केलंय. शाळेतल्यांनी मला इतके बोल लावले आहेत की मला हे करावं लागलं. जर माझ्या शरीराचा कोणताही भाग व्यवस्थित असेल तर कृपया खरंच गरज असेल अशा व्यक्तीला अवयव दान करा. माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी खूप काही केलंय, मला माफ करा मी त्यांना काहीही देऊ शकलो नाही. सॉरी दादा, मी उद्धट वागलो. सॉरी आई इतक्यांदा तुझं मन दुखावलं, आता शेवटचं दुखावतोय. शाळेचे शिक्षक आहेतच असे, मी काय बोलू. युक्ति मॅम, पाल मॅम, मनु कालरा मॅम. माझी शेवटची इच्छा आहे त्यांच्याविरोधात कारवाई केली जावी. अन्य कोणत्याही मुलाने माझ्यासारखं काही करावे, अशी माझी इच्छा नाही. आता कृपया इथून पुढे वाचू नका, केवळ माझ्या कुटुंबीयांसाठी आहे...

घरी पोहोचवण्यात आला मृतदेह

विद्यार्थ्याचा मृतदेह बुधवारी रात्री (19 नोव्हेंबर) रोजी सांगली जिल्ह्यातील त्याचा मूळ गावी पोहोचवण्यात आला. गुरुवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. इतका हुशार, शांत आणि अभ्यासात कायम अव्वल असणारा मुलगा इतका कसा खचला, असा प्रश्न स्थानिकांमध्ये निर्माण झालाय.  

Shocking DNA Test: पती-पत्नीने DNA टेस्ट केली, रिपोर्ट पाहून पायाखालची जमीन सरकली,सासऱ्याचं धक्कादायक रहस्य उघड

(नक्की वाचा: Shocking DNA Test: पती-पत्नीने DNA टेस्ट केली, रिपोर्ट पाहून पायाखालची जमीन सरकली,सासऱ्याचं धक्कादायक रहस्य उघड)

पोलीस करतायेत तपास 

दिल्ली मेट्रो पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केलीय, शाळा कर्मचाऱ्यांची चौकशी केली जातेय. मृत विद्यार्थ्याचे कुटुंबीय न्याय मिळवून देण्याची तसेच दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com