जाहिरात

Dhule News :अतिक्रमण हटवण्यास मनपाची टाळाटाळ; तरुणाच्या संपूर्ण परिवाराने उचललं धक्कादायक पाऊल, मनपात खळबळ

बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करीत तक्रारदाराने धक्कादायक पाऊल उचललं.

Dhule News :अतिक्रमण हटवण्यास मनपाची टाळाटाळ; तरुणाच्या संपूर्ण परिवाराने उचललं धक्कादायक पाऊल, मनपात खळबळ
AI Image

नागिंद मोरे, प्रतिनिधी

Dhule News : धुळे शहरातील रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करीत तक्रारदार नितीन शिंदे नामक व्यक्तीने मनपा आयुक्तांच्या दालनासमोर थेट आत्मदनाचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर धुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. आपल्या कुटुंबासह शिंदे यांनी जोरदार घोषणाबाजी करीत हे आंदोलन केलं. अखेर उपायुक्त हेमंत निकम यांनी समजूत घालून कारवाईचं आश्वासन दिल्याने तरुणाने आत्मदहन करण्याचं स्थगित केलं.

अतिक्रमणाची कारवाई न केल्याने आत्मदहनाचा इशारा

रमाबाई आंबेडकर नगर येथील एका अतिक्रमण कारवाईसाठी नितीन सुभाष शिंदे हे मनपात तक्रारी करून पाठपुरावा करीत होते. या पार्श्वभूमीवर 16 जूनपर्यंत अतिक्रमण हटविण्याची कारवाई न झाल्यास 17 जून रोजी आत्मदहन करू असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक तसेच बांधकाम विभागाचे पथक आले आणि कारवाई न करता निघून गेले. उलट आपल्या कुटुंबाला आणि आपल्यालाच घर पाडण्याची धमकी दिली. असा आरोप करीत आज नितीन शिंदे हे आपल्या कुटुंबातील महिलांसह मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी त्यांनी एका बाटलीतून आणलेले पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

नक्की वाचा - Mumbai News : 24 तासांच्या आत निर्णय मागे; IAS अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती

यानंतर मोठी खळबळ उडाली आणि मनपाचे अधिकारी कर्मचारी यांनी धावपळ करुन शिंदे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर उपायुक्त हेमंत कापडणीस यांनी नितीन शिंदे यांना संबंधित तक्रार केलेले अतिक्रमण लवकरच काढू असे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपल्या आंदोलन सध्या स्थगित करीत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com