जाहिरात

Political News : भाजपचं 'मिशन घरवापसी'; विधानसभा निवडणूक निकालानंतर मराठवाड्याचं राजकारण बदललं

Marathwada Political News :जालन्यातील घनसावंगीत शिवसेना शिंदे गटाच्या हिकमत उढाण यांच्याविरोधात अपक्ष लढलेले सतीश घाटगे देखील भाजपमध्ये परतले आहेत.

Political News : भाजपचं 'मिशन घरवापसी'; विधानसभा निवडणूक निकालानंतर मराठवाड्याचं राजकारण बदललं

Marathwada Political News : शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभा लढवणारे दिनेश परदेशी आज भाजपात घरवापसी करणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर मतदारसंघांतून परदेशी यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. दिनेश परदेशी यांचे कार्यकर्ते भल्या पहाटे वैजापूरहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिनेश परदेशी हे वैजापूरमधील भाजपने कट्टर समर्थक मानले जातात. मात्र विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने नाराज होत त्यांना शिवबंधन हाती बांधलं होतं. मात्र भाजप सोडून उद्धव ठाकरेंचे शिवबंधन बांधणारे दिनेश परदेशी पाच महिन्यात ठाकरे गटाला रामराम ठोकत पुन्हा घरवापसी करणार आहेत. 

(नक्की वाचा- Nashik News: कृषिमंत्री कोकाटेंना तात्पुरता दिलासा! 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती; कोर्टाने काय म्हटलं?)

अनेक नेत्यांची भाजपात घरवापसी

दिनेश परदेशी यांच्याशिवाय सिल्लोडमध्ये शिंदे सेनेचे अब्दुल सत्तारांविरोधात ठाकरे गटाकडून निवडणूक लढलेले सुरेश बनकर तीनच महिन्यात पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत. वैजापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे रमेश बोरनारे यांच्याविरोधात लढलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधवही पुन्हा भाजपात परतले आहेत. 

जालन्यातील घनसावंगीत शिवसेना शिंदे गटाच्या हिकमत उढाण यांच्याविरोधात अपक्ष लढलेले सतीश घाटगे देखील भाजपमध्ये परतले आहेत. तर विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत नांदेड दक्षिणमधून निवडणूक लढलेले दिलीप कंदकुर्ते यांनी देखील पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

(नक्की वाचा-  Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप)

लोहा मतदारसंघातून भाजपची साथ सोडून उद्धव टाकरे गटाकडून निवडणूक लढवणारे एकनाथ पवार पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत. तर नांदेड उत्तरमधून विधानसभा लढवणारे मिलिंद देशमुख यांनी देखील भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: