जाहिरात

Diveghat traffic : दिवेघाटातील वाहतूक मार्गात बदल, वाचा काय आहेत पर्यायी मार्ग?

Diveghat traffic : दिवेघाटातील वाहतूक मार्गात बदल, वाचा काय आहेत पर्यायी मार्ग?
प्रतिकात्मक फोटो ( Gemini AI)


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग अंतर्गत हडपसर ते दिवेघाट या पॅकेज 6 चे रस्ता रुंदीकरण करण्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालया मार्फत सुरु आहे. पालखी मार्ग रूंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी खडकामध्ये ब्लास्टींगचे काम करणे गरजेचे असल्याने खडक ब्लास्टींगचे काम पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणामध्ये सुरु आहे. 
पोलीस यंत्रणेच्या परवानगीनुसार ज्या दिवशी ब्लास्टींग करण्यात येईल त्या दिवशी दिवेघाटातील वाहतूक सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार असून दिवेघाटातून (दोन्ही बाजूने) प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी या दिवशी  पर्यायी वाहतूक मार्गावरून वाहतूक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

( नक्की वाचा : सेवानिवृत्त शिक्षिकेचा घरातच संशयास्पद मृत्यू, पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह )

कात्रज बोपदेव घाट (राज्य मार्ग क्र. 131) मार्गे सासवड, खेडशिवापूर-सासवड लिंक रोड मार्गे सासवड, कापूरहोळ-नारायणपूर (राज्य मार्ग क्र. 119) मार्गे सासवड त्याच प्रमाणे हडपसर-उरळी कांचन शिंदवणे घाट मार्गे (राज्य मार्ग क्र. 61) सासवड अशा पर्यायी मार्गाचा वापर करावा असे, आवाहन एस एस कदम, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पकाई पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com