
Pune Diwali Vehicle Sales 2025: दसरा (Dussehra) ते दिवाळी (Diwali) या सणासुदीच्या काळात पुणेकरांनी नवीन वाहन खरेदीचा (New Vehicle Purchase) उत्साह कायम ठेवला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) पुणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ते १७ ऑक्टोबर या सतरा दिवसांच्या कालावधीत आर टी ओ कार्यालयात एकूण १३ हजार १८७ नवीन वाहनांची नोंद झाली आहे.
यावर्षी वाहन खरेदीच्या आकड्याने गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील नोंदींना मागे टाकले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १,५५२ वाहनांची (सुमारे १२.९४ टक्के) वाढ नोंदवली गेली आहे. एकूण नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे. दिवाळी ते दसरा या कालावधीत तब्बल ७,९९१ दुचाकींची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ९२८ ने जास्त आहे, ज्यामुळे दुचाकींच्या बाजारपेठेत मोठी तेजी दिसून आली आहे.
दुचाकींच्या पाठोपाठ चारचाकींच्या (Four Wheelers) खरेदीतही चांगली वाढ झाली आहे. यंदा या १७ दिवसांत ३,९९२ चारचाकी वाहनांची नोंद झाली आहे. वाहन खरेदीत वाढ दिसत असताना, काही विशिष्ट प्रकारच्या वाहनांच्या खरेदीत मात्र घट झाली आहे. यामध्ये पर्यटन टॅक्सी (४६७ वरून २१८) आणि मालवाहतूक वाहनांच्या (६३५ वरून ४६८) नोंदीत लक्षणीय घट झाली आहे. याउलट, 'इतर' प्रकारात मोडणाऱ्या वाहनांच्या नोंदीत मोठी वाढ झाली आहे. ही नोंद १५३ वरून ५५९ वर पोहोचली आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दिवाळीनिमित्त पुणेकरांनी वाहन खरेदीत मोठा रस दाखवला आहे. कंपन्यांकडून मिळणाऱ्या सवलती, फायनान्स स्कीम आणि काही वाहनांवरील सरकारी सवलतीमुळे बाजारात उत्साह निर्माण झाला आहे. जीएसटी (GST) कपातीचा थेट परिणाम परिवहन वाहन विक्रीवर झाला असून, ग्राहकांना कमी दरात फायनान्ससह वाहने घेणे सोपे झाले आहे. एकंदरीत, या दिवाळीच्या काळात पुणेकरांनी वाहन खरेदीत मोठा उत्साह दाखवला असून, विशेषतः दुचाकी आणि चारचाकींच्या बाजारपेठेत तेजी दिसून आली आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुण्याच्या मॉर्डन कॉलेजमुळे मराठी तरुणानं लंडनमधील नोकरी गमावली? प्राचार्यांनी दिलं उत्तर )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world