विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाची पत्रकार (Election Commission Press conference) परिषद दुपारी ३.३० वाजता होणार आहे. त्यामुळे आजपासून आचारसंहिता लागू होणार आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत आज विधानसभेच्या तारखांची घोषणा होतील. त्यामुळे दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
नक्की वाचा - Big News : राज्यपालनियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांची नावं जाहीर, आजच होणार शपथविधी
महाराष्ट्रासह झारखंडच्या निवडणुकीच्या तारख्या आज पत्रकार परिषदेत जाहीर केल्या जातील. पत्रकार परिषद झाल्यानंतर राज्यभरात आचारसंहिता लागू होतील. या काळात सर्वच राजकीय पक्षांवर निर्बंध असतील. निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीच्या आणि निकालाच्या तारखा जाहीर करतील. मात्र राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. दोन्हीही गटाकडून अद्याप नावांची घोषणा करण्यात आलेली नाही.
महाराष्ट्रात गेल्या दोन वेळा (2014 आणि 2019) एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. 2014 मध्ये 15 ऑक्टोबर रोजी सर्व 288 जागांसाठी मतदान झाले होते. तर 2019 मध्ये 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान झाले होते.
आज होणार निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा. पुढचा महिनाभर राज्यात प्रचाराचा धुरळा उडणार. #LatestUpdates #MaharashtraElection2024 pic.twitter.com/4qvESYpxRJ
— NDTV Marathi (@NDTVMarathi) October 15, 2024
तर झारखंडमध्ये गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येकी पाच टप्प्यांत मतदान झाले. 2014 मध्ये 25 नोव्हेंबर, 2 डिसेंबर, 9 डिसेंबर, 14 डिसेंबर आणि 20 डिसेंबर रोजी मतदान झाले. तर 2019 मध्ये 30 नोव्हेंबर, 7 डिसेंबर, 12 डिसेंबर, 16 डिसेंबर आणि 20 डिसेंबर रोजी मतदान झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world