बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री गवळी इथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील तलावात महिलेसह आपल्या दोन चिमुकल्यांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच खामगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह जेव्हा बाहेर काढण्यात आले त्यावेळी ते एकमेकांना बांधलेल्या स्थितीत दिसले. त्यामुळे महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांना आपल्या कंबरेला बांधून नंतर आत्महत्या केल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पार्वती प्रकाश इंगळे वय वर्ष 30 या अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे या गावच्या मुळ रहिवाशी होत्या. त्यांचा विवाह झाला होता. पण पती बरोबर त्याचे पटत नव्हते त्यामुळे त्या विभक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्या पिंप्री गवळी या गावात राहात होत्या. पण राहत्या घरातून त्या दोन मुलांसह काही दिवसांपूर्वी बाहेर पडल्या. त्यानंतर सोमवारी त्यांचा मृतदेह थेट गावाच्या तलावात कुजलेल्या स्थिती आढळला. त्यांनी मुलगा आर्यान इंगळे वय 8 वर्ष आणि मुलगी प्राची इंगळे वय 5 वर्ष यांच्या सह आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले.
ट्रेंडिंग बातमी - राज्यातील 10 लाख तरुणांना मिळणार रोजगार, वाचा सरकारचा मास्टरप्लान
त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. ही बातमी वाऱ्या सारखी पसरली. पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तीनही मृतदेह बाहेर काढले. त्यावेळी ते एका दुपट्ट्याने एकमेकामध्ये बांधले गेले होते. शिवाय मृतदेह हे कुजलेल्या स्थितीत होते. याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यानंतर पार्वती इंगळे यांचे वडील मुरलीधर खंडारे यांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे.
त्यांच्या तक्रारी नुसार खामवार पोलीसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. मात्र ज्या पद्धतीने या तिघांचे ही मृतदेह पोलीसांना आढळून आले आहेत, ते पाहात पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ही खरोखर आत्महत्या आहे की घातपात याचा तपास आता पोलीस करत आहेत. या आत्महत्येनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आईनं आपल्या दोन लेकरांसह जीवन संपवलं. त्यामागे काय कारण असेल याची चर्चा सध्या गावात सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world