उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज २८ जानेवारी २०२५ रोजी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या अकाली एग्झिटमुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राजकारणातील दिलदार माणूस गमावली खंत व्यक्त केली जात आहे. अजित पवार बारामतीच्या विकासासाठी खूप झटले, शेवटी त्याच मातीत त्यांचा दुर्देवी शेवट झाला.
त्यांच्या निधनानंतर अजित पवारांच्या अपघाताबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होण्याच्या २१ तास आधीच विकिपीडियाने अजित पवार यांच्या पेजवर त्यांच्या मृत्यूची तारीख अपडेट केली होती. त्यामुळे, ही दुर्घटना घडवून आणल्याचा संशय निर्माण होतोय, असे दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. दरम्यान याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होण्याच्या २१ तास आधीच विकिपीडियाने अजित पवार यांच्या पेजवर त्यांच्या मृत्यूची तारीख अपडेट केली होती. त्यामुळे, ही दुर्घटना घडवून आणल्याचा संशय निर्माण होतो, अशा आशयाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले दावे खोटे आहेत.#FactCheck… pic.twitter.com/D6e0kvz5oL
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 29, 2026
DGIPR ने यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, अशा आशयाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले दावे खोटे आहेत. विकिपीडिया Coordinated Universal Time (UTC) ही कालमापन पद्धत वापरते. ते भारतीय प्रमाणवेळेपेक्षा (IST) सुमारे ५.५ तास मागे आहे. त्यामुळे स्थानिक वेळेनुसार पाहिल्यास विकिपीडियावरील माहिती आधी अपलोड केली आहे असे वाटू शकते. तसेच, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक स्क्रीनशॉट्स ब्राउझरमधील ‘inspect element' साधनांचा वापर करून त्याची वेळ बदलून तयार करण्यात आले असून, त्याद्वारे चुकीची माहिती पसरवली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world