जाहिरात

Accident News: एक युटर्न अन् होत्याचं नव्हतं.. भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर अचानक यु टर्न घेतल्याने मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार पूर्णतः शतिग्रस्त झाली.

Accident News: एक युटर्न अन् होत्याचं नव्हतं.. भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली: गडचिरोलीमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाने जात असताना अचानक यू टर्न घेतल्याने मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. यात कारमधील तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना चामोर्शी शहरातील आष्टी- गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर घडली.

विनोद पुंजाराम काटवे (45), राजू सदाशिव नैताम (45) आणि सुनील वैरागडे (55) सर्व  रा. गडचिरोली असे ठार झालेल्यांची नावे असून अनिल मारोती सातपुते (50) वर्ष, रा. चामोर्शी  हे गंभीर जखमी आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालयात चामोर्शी येथून सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर केले आहे. चारही जण कामानिमित्त कारने आष्टीकडे जात होते. दरम्यान चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर अचानक यु टर्न घेतल्याने मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार पूर्णतः शतिग्रस्त झाली. त्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंढरपूरमध्ये अपघात

पुणे पंढरपूर महामार्गावर पुरंदर तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे एसटी बस आणि मोटरसायकल अपघातामध्ये मोटरसायकल वरील एकजन गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमीला नीरा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.जखमी व्यक्तीच नाव शंकर कांबळे असून तो उरुळी कांचन येथील सहिवाशी आहे.  यामध्ये मोटरसायकल वरील एक जण गंभीर  रित्या जखमी झाला आहे. 

रविकांत तुपकरांच्या गाडीचाही अपघात

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला रविवारी (दि. 18 मे) रात्री 1 वाजेच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्यावर अपघात झाला.मद्यधुंद अवस्थेतील ट्रक ड्राइव्हरने तुपकर यांच्या इनोव्हाला मागून धडक दिली. सुदैवाने यात कुणाला जीवितहानी व गंभीर दुखापत झाली नाही.गाडीतील दोघांना किरकोळ मार लागला आहे.

नक्की वाचा - Ajit Pawar Speech : "माझ्या चुलत्याच्या पुण्याईनं…", अजित पवारांनी केले शरद पवारांचं तोंड भरून कौतुक

 दुसरीकडे, पालोरा येथील आठवटी बाजार घेवून दुचाकीने गावाकडे निघालेल्या दोन युवकांना भरधाव ने  जोरदार धडक दिली. या घटनेत आशिष सुखराम वालदे याचा जागीच मृत्यू ह्याला. तर गणेश हृलीचंद साठवणे (45, खडकी) जखमी झाला. ही घटना शनिवार १७ मे रोजी पालोरा ते खडकी सिमेंट रोडवर रात्री 9 वाजताच्या सुमारास हृडकी 6 तलावाशेजारी घडली. 5 जखमीवर करही येथील प्राथमिक 6 आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. 

दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील देवधे फाटा येथे ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातामध्ये मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र रघुनाथ सुपल असं या अपघातात मृत्यू पडलेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे. देवधे बसस्टॉपनजीक हा अपघात घडला. ट्रक चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी पुढे आलं आहे.

(नक्की वाचा-  NIA मोठी कारवाई, पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात दोन दहशतवाद्यांना अटक)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com