जाहिरात

Gadchiroli News : ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, बायकोने नवऱ्यासमोरच सोडला जीव

Gadchiroli News : संजय बाला येलेलावार असे जखमीचे तर कमला संजय येलेलावार (37 वर्षे) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. 

Gadchiroli News : ट्रकची दुचाकीला जोरदार धडक,  बायकोने नवऱ्यासमोरच सोडला जीव

मनीष रक्षमवार, गडचिरोली

Gadchiroli News : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला आहे. तर नवरी गंभीर जखमी झाला आहे. अहेरील जवळील दिना नदीजवळ हा अपघात झाला. संजय बाला येलेलावार असे जखमीचे तर कमला संजय येलेलावार (37 वर्षे) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, येलेलावर दाम्पत्या अहेरीच्या आठवडी बाजारात येण्यासाठी निघाले होते. दरम्यान या दाम्पत्याच्या दुचाकीला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत पत्नी कमला येलेलावार यांचा जागीच मृत्यू झाला. तर पती संजय येलेलावार गंभीर जखमी झाले आहेत.

 या दाम्पत्याला चार मुलीच असल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अचानक ओढवलेल्या या प्रसंगाने येलेलावार दाम्पत्याच्या मुली कल्याणी, मौणिक, रेखा व श्रुती या आईला पोरक्या झाल्या आहेत.

नागपूरमध्ये अपघातात तिघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात भरधाव टिप्परने मागून येऊन समोरील डांबर भरलेल्या ट्रकला धडक दिली. टिप्पर चालकाचा दबून घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून अन्य एक जखमी आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: