जाहिरात

गणपती विसर्जनाला गालबोट! राज्यभरात 11 जणांचा मृत्यू

एकीकडे गणेश विसर्जन होत असताना दुसरीकडे बुडून मृत्यू झालेल्यांच्या घरी मात्र शोककळा पसरली आहे. शिवाय त्यांच्या परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

गणपती विसर्जनाला गालबोट! राज्यभरात 11 जणांचा मृत्यू
मुंबई:

गणेश विसर्जनाच्या उत्साहात राज्यभरात जवळपास 11 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहेत. त्यात धुळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली येवून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अकोला, अमरावती आणि छत्रपती संभाजी नगर इथेही गणेश विसर्जना दरम्यान पाण्यात बुडून मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एकीकडे गणेश विसर्जन होत असताना मृत्यू झालेल्यांच्या घरी मात्र शोककळा पसरली आहे. शिवाय त्यांच्या परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धुळे जिल्ह्यातील चितोड गावात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकी सुरू असताना ट्रॅक्टरखाली येऊन तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर जखमींना त्वरीत धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले. पण त्यातील तिघांना मृत घोषीत करण्यात आले. विसर्जन मिरवणूक उत्साहात सुरु असताना अचानक ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रॅक्टर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या गर्दीत शिरला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला.  काही मुलांना हे समजण्या आत ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर गेला. या अपघातात परी बागूल 13 वर्षे, शेरा सोनवणे 6 वर्ष आणि लड्डू पावरा 3 वर्षे, या मुलांचा मृत्यू झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले. मृत आणि जखमी सर्व चितोड येथील रहिवासी आहेत. दरम्यान एकीकडे मिरवणुकीत तिंघाचा मृत्यू झाला असताना दुसरीकडे धुळ्यातील दोन सख्ख्या भावांचा ही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  

ट्रेंडिंग बातमी - DJ चा कहर? आवाजामुळे एकाचा मृत्यू झाल्याचा दावा, तीन जण जखमी

अकोल्यात गणेश विसर्जनादरम्यान ही अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि म्हैसांग येथील पूर्णा नदीवर गणेश विसर्जनावेळी दोघांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. म्हैसांग इथे 18 वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झालाय. गणेश गायकवाड असे मृत तरुणाचे नाव आहे. गणेश हा अकोला शहरातील अकोट फेल भागातील रहिवासी आहे. गणेश हा आईसोबत घरगुती गणेशाचा विसर्जन करण्यासाठी म्हैसांग इथल्या पूर्णा नदीवर गेला होता. गणेश विसर्जनावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला. विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी त्याला नदीबाहेर काढले. रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. तर या आधी बाळापूर शहरात घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जनादरम्यान, 25 वर्षीय युवकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. सुरज माणिक तायडे असं या मृत तरुणाचे नाव आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  कलम 370 हटवल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये आज मतदान, काश्मिरी पंडितांसाठी विशेष सोय

धुळे, अकोल्या प्रमाणेच अमरावतीतही गणेश विसर्जना वेळी अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील इसापूरचे रहिवाशी असलेले  दोन गणेश भक्त गणपती विसर्जनासाठी गेले होते. त्यावेळी  पूर्णानगर नदीपात्रात दोघेही पाण्यात वाहून गेल्याची घटना घडलीय. मयूर गजानन ठाकरे वय 28 आणि अमोल विनायक ठाकरे वय 40 असे वाहून गेलेल्या व्यक्तींची नावे आहेत. घटनास्थळी आसेगाव पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे.अन्य एका घटनेत जिल्ह्यातील दारापूर येथील संजय पवार हा युवकही बुडाला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - "राहुल गांधींच्या जीभेला चटके दिले पाहिजेत", भाजप खासदाराचं बेताल वक्तव्य

छत्रपती संभाजीनगरच्या घाणेगावमध्येही गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे. इथे मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा घाणेगाव येथील तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  अभय सुधाकर गावंडे असं तरुणाचे नाव आहे. रांजणगाव येथील चार तरुण गणपती विसर्जनासाठी घाणेगाव येथील तलावाजवळ गेले होते. चौघे जण गणपती घेवून तलावात उतरले यावेळी अभय हा पुढे होता. अभय याला तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो  बुडाल्याचं सांगितलं जात आहे. 


 

Previous Article
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचडांना ब्रेन स्ट्रोक, रुग्णालयात दाखल
गणपती विसर्जनाला गालबोट! राज्यभरात 11 जणांचा मृत्यू
Senior Congress leader Rohidas Patil passed away
Next Article
Rohidas Patil : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचं निधन