राज्यभरात आज धुलिवंदनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे, मुंबई ठाण्यात मराठी कलाकारांची धुळवड साजरी केली जाणार आहे. तर राजकीय नेतेही धुळवड साजरी करतील. काल होलीकेचं दहन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुळवड साजरी केली जाते. काही ठिकाणी रंगपंचमीला रंग खेळण्याची पद्धत आहे. मात्र अधिकतर धुळवडला रंग खेळले जातात.
मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळ ट्राफीक जाम
कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी गर्दी केली आहे. माणगाव जवळ खूप ट्रॅफिक जाम झाले आहे. पूर्ण रस्ता जाम झाला आहे. रस्त्याचं काम आणि गावी जाणाऱ्या गाड्यांमुळे रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
बदलापूरच्या उल्हास नदीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू
बदलापूरच्या उल्हास नदीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला आहे. चारही जण चामटोली जवळील पोद्दार गृह संकुलातील राहणारे आहेत.
Pune News: पुण्यातील मोक्याच्या आरोपीला दोन वर्षांनी पुणे पोलिसांच्या बेड्या
पुण्यातील मोक्याच्या आरोपीला दोन वर्षांनी पुणे पोलिसांच्या बेड्या
खुनाच्या गुन्ह्यात मोक्कालागलेला आणि दोन वर्षापासून फरार असलेला आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक
अटक केलेला आरोपी सराईत गुंड असून तो पुण्यातील पंडित गँगचा मोहोरक्या देखील आहे
आरोपीवर पुण्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल
अटक केलेल्या आरोपीवर शहरातील चार पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल
सूर्यकांत उर्फ पंडित कांबळे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव
आरोपीकडून २ पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे पोलिसांकडून जप्त
LIVE Update: सतीश भोसलेला सात दिवसांची कोठडी द्या.. पोलिसांची मागणी
बीड मारहाण प्रकरणातील आरोपी खोक्या उर्फ सतीश भोसले याला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली असून सरकारी वकिलांनी खोक्याची सात दिवसाची पोलीस कोठडी मागितली आहे दिवाणी व फौजदारी न्यायालयात सुरू आहे सुनावणी.
LIVE Updates: साईनगरी शिर्डीमध्ये भरणार वारकरी संमेलन
यंदाचे वारकरी साहित्य परिषदेचे तेरावे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन शिर्डी याठिकाणी 22 आणि 23 मार्च रोजी होणार आहे. या संमेलनासाठी संत तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. संजय महाराज देहूकर हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत. तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वागताध्यक्ष असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार , मराठी भाषा मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. यंदा प्रथमच 9 राज्यातील वारकरी सांप्रदायिक प्रतिनिधी या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत. संत साहित्याचा आणि मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे संमेलन आयोजित करण्यात येत आहे.
Amravati News: सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट, शहरातील तिन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद
आज धूळवड...या दिवशी कायदा व सुव्यस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अमरावती शहरात 1 हजार पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. यात तिन डीसीपी व 12 अधिकारी रस्त्यावर आहेत. तसेच महत्वाच्या ठिकाणी चौकात नाकाबंदी लावण्यात आली आहे, दारुड्यानी शहरात धुमाकूळ घालू नये यासाठी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम सुद्धा पोलीसाकडून राबविण्यात आली आहे. इर्विन ते राजापेठ, राजापेठ ते रवीनगर, गाडगेनगर ते शिवाजी कॉलेज यासह शहरातील तिन्ही उड्डाणपूल आज दिवसभर वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.
Baramati News: बारामतीत मटण खरेदीसाठी पहाटेपासून गर्दी
आज धुळवड आणि ती मटन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. बारामतीत देखील मटन शौकिनांनी मटन घेण्याकरिता सकाळी पाच वाजल्यापासून गर्दी केली आहे. शहरातील विशाल जवारे यांचे कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय करीत असून रात्री 12 नंतर त्यांनी याची तयारी सुरू केली होती. सकाळी नऊ वाजेपर्यंत 90 ते 95 बोकड झाली असून दिवसभरात 200 बोकडांचा
व्यवसाय होईल असे त्यांनी सांगितले आहे.
LIVE Updates: मंत्री गुलाबराव पाटलांची धुळवड
जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांनी बालगोपालांसमवेत धुलीवंदन साजरी केली असून बालगोपालांनी गुलाबराव पाटलांना घेराव घालून गुलाबराव पाटलांवर रंगांची उधळण केली. दरम्यान गुलाबराव पाटलांनीही बालगोपालन समवेत धुलीवंदनाचा आनंद लुटला
Malshiras News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन
माळशिरस तालुक्यातील अकलूज, निमगाव अशा प्रमुख गावांकडे जाणारे रस्ते खराब अवस्थेत आहेत. या रस्त्याची कामे तात्काळ सुरू करण्याची आवश्यकता आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना ठिय्या आंदोलन करून धारेवर धरत तात्काळ रस्त्याची कामे सुरू करण्याचे आदेश पारित करून घेतले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्याने आता माळशिरस मधील रस्त्याच्या कामांना गती मिळणार आहे.
LIVE Updates: वाघोबाचे हल्ले वाढले; वनविभागाची पळापळ
रामलिंगच्या अभयारण्यात रमलेल्या वाघाने काही दिवस शांततेत घालवल्यानंतर आता पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारच्या रात्रीतून पांगरीत एका वासराचा जीव घेतल्यानंतर वनविभागाने बुधवारी तेथे सापळ्याची तयारी केली. मात्र, वाघाने पुन्हा एकदा पथकाला हुलकावणी देत मलकापूर शिवार गाठत येथे दोन गायींवर हल्ला केला आहे. यामुळे पुन्हा वनविभागाची धावपळ उडाली. मागील जवळपास तीन महिन्यांपासून वाघाने रामलिंग अभयारण्यात तळ ठोकला आहे. त्यास पकडून सुरक्षित अधिवासात सोडण्यासाठी दोन महिन्यांपासून प्रयत्न केले जात आहेत.
LIVE Updates: आमदार भास्कर जाधव देहभान विसरून ग्रामदेवतेची पालखी नाचवतात
कोकणात सध्या शिमगोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. कोकणातील शिवसेना उबाठाचे नेते, आमदार भास्करराव जाधव हेदेखील दरवर्षीप्रमाणे आज त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी देहभान विसरून ग्रामदेवता श्री शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवताना दिसले. आपल्या ग्रामदेवतेवर प्रचंड श्रद्धा असलेले आमदार भास्कर जाधव हे काहीही झालं आणि कुठेही असले तरी नवरात्र उत्सवात श्री शारदा मातेच्या दरबारात पारंपरिक जाखडी नृत्य करण्यासाठी आणि शिमगोत्सवात पालखी नाचविण्यासाठी पोहोचतात.
Live Updates: खोक्याचा मोबाईल पोलिसांकडून जप्त, धक्कादायक खुलासे होणार
खोक्याचा पोलिसांनी मोबाईल केला जप्त
खोक्याला कुणी पळण्यात मदत केली का याचा पोलीस करणार तपास
खोक्याच्या मोबाईलमधून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता
Ratnagiri News: रत्नागिरीत रंगला डोळ्याचे पारणे फेडणारा पालखी भेटीचा सोहळा
कोकणात होळीला सर्वात मोठं आकर्षण असतं ते दोन देवतांच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळ्याचं. रत्नागिरी शहरातील बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी मंदिरात फाल्गुन पोर्णिमेच्या मध्यरात्री मिऱ्या येथील ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला.. वर्षातून केवळ एकदाच रंगणारा आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या हा उत्सवाची झलक पाहण्यासाठी हजारो भाविक या पालखी भेटीच्या क्षणावेळी उपस्थित होते..
Accident News: पसरणी घाटात झालेल्या कार अपघातात दुसऱ्याचा मृत्यू
काल कोकण आणि महाबळेश्वर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची कार महाबळेश्वर वाई रोडवरील पसरणी घाटातून दारीत कोसळली. ट्रेकर्स आणि स्थानिकांच्या मदतीन दरीतून चौघांना बाहेर काढले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर तीघा गंभीर जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तीन जखमींपैकी आणखी एकाचा मृत्यू झाला असून दोघांवर उपचार सुरू आहेत.
Mumbai News: खोक्या भाईला महाराष्ट्रात आणलं, थोड्याच वेळात बीडला आणणार
खोक्या उर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी प्रयागराजमध्ये बेड्या ठोकल्यानंतर त्याला आज महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. आधी मुंबई आणि त्यानंतर छत्रपती संभाजी नगरला खोक्याला विमानाने आणण्यात आलं. संभाजीनगरहून आता बीड पोलीस बाय रोड त्याला बीडकडे घेऊन जात आहे. पुढील तासाभरात खोक्याला बीडला नेण्यात येईल.
Mumbai News: मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर घसरला, शहरात धुक्याची चादर
मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर घसरला. संपूर्ण मुंबईभर धुरक्याची चादर पसरलेली दिसत आहे. याचा परिणाम दृश्यमानतेवर देखील झालेला आहे. मुंबईतील अनेक गगनचुंबी इमारती या दूरच्या लपल्याचं दिसून येतंय.
Live Update : जाहीरनाम्याची होळी करून शेतकऱ्यांचा सरकारच्या धोरणाविरोधात संताप
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या वर्डी येथे शेतकऱ्यांनी अनोखी होळी करत अर्थसंकल्पात कर्जमाफीवर कुठलीही तरतूद न केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करून सरकार विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.