जाहिरात

Holi 2025 : रत्नागिरीत रंगला डोळ्याचे पारणे फेडणारा शिमगोत्सव, पालखी भेटीचा अनोखा सोहळा

रत्नागिरीच्या ग्रामदेवतेची पालखी ही आता बारा वाड्यांमध्ये फिरण्याकरता आज रवाना झाली.

Holi 2025 : रत्नागिरीत रंगला डोळ्याचे पारणे फेडणारा शिमगोत्सव, पालखी भेटीचा अनोखा सोहळा

कोकणात होळीला सर्वात मोठं आकर्षण असतं ते दोन देवतांच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळ्याचं. रत्नागिरी शहरातील बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी मंदिरात फाल्गुन पोर्णिमेच्या मध्यरात्री मिऱ्या येथील ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. वर्षातून केवळ एकदाच रंगणारा आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या हा उत्सवाची झलक पाहण्यासाठी हजारो भाविक पालखी भेटीच्या क्षणावेळी उपस्थित होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 सडामिर्‍या आणि जाकिमिऱ्या येथील श्री देवी नवलाई पावणाई आणि म्हसोबाग्रामदेवतेची पालखी भैरीबुवाच्या भेटीला येते. देवळाच्या प्रांगणात या दोन पालख्यांचा भेटीचा सोहळा रंगतो. यावेळी ढोल ताशांच्या गजरानं मंदिराचा परिसर दणाणून जातो. दोन पालख्यांची समोरासमोर भेट घडते आणि वर्षातून फक्त एकदाच हा क्षण पहायला मिळतो. या भेटीच्या कार्यक्रमांनी रत्नागिरीतल्या होळी उत्सवाला आणखी रंग चढतो. दोन पालख्यांच्या या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हजारो लोक मध्यरात्री भेरीच्या देवळात येतात. दोन देवांच्या पालखीचा हा अनोखा सोहळा वर्षातून केवळ काही क्षणच पहायला मिळतो. त्यामुळे हा सोहळा आपल्या डोळ्यास साठवण्यासाठी हजारो चाकरमानी या ठिकाणी हजेरी लावतात. हा पालखी सोहळा पाहून अनेक जणं भारावतात.

Holi 2025: होळीच्या दिवशी एकमेकांना रंग का लावतात? हे तुम्हाला माहिती आहे का? वाचा काय आहे परंपरा

नक्की वाचा - Holi 2025: होळीच्या दिवशी एकमेकांना रंग का लावतात? हे तुम्हाला माहिती आहे का? वाचा काय आहे परंपरा

या  पालखी सोहळ्याप्रमाणे ढोल ताशांच्या गजरानं मंदिराचा परिसर दणाणून जातो. रत्नागिरीच्या ग्रामदेवतेची पालखी ही आता बारा वाड्यांमध्ये फिरण्याकरता आज रवाना झाली. पुढील काही दिवस रत्नागिरी सह संपुर्ण कोकणात हा शिमगोत्सव याच जल्लोषात साजरा होताना पहायला मिळेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: