जाहिरात

Naxalism : 45 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात नक्षलवादाचा शिरकाव कसा झाला? असा आहे नक्षलवादाचा रक्तरंजित इतिहास

४५ वर्षांपूर्वी १९८० मध्ये नक्षलवादाने महाराष्ट्रात कशा प्रकारे प्रवेश केला, याबाबत एनडीटीव्हीचे कार्यकारी संपादक जीतेंद्र दीक्षित यांचं पुस्तक ट्रबल शूटरमधील काही भाग...

Naxalism : 45 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात नक्षलवादाचा शिरकाव कसा झाला? असा आहे नक्षलवादाचा रक्तरंजित इतिहास

जीतेंद्र दीक्षित, मुंबई

महाराष्ट्रात नक्षलवादी आंदोलनाला बुधवारी मोठा धक्का बसला. नक्षलवाद्यांचा मोठा नेता भूपतीसह 61 नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह सर्व उच्च अधिकारी उपस्थित होते. गेल्या काही काळातील हे सर्वात मोठं नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण मानलं जात आहे. एकेकाळी महाराष्ट्रात मोठ्या नक्षलवादी कारवाया सुरू होत्या. मात्र आता बोटांवर मोजण्या इथपत नक्षलवादी शिल्लक राहिले आहेत. या आत्मसमर्पणानंतर लवकरच सरकार नक्षलवादमुक्त महाराष्ट्राची घोषणा करणार आहे. कारण या आत्मसमर्पणानंतर उरलेल्या नक्षलवाद्यांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2026 पर्यंत भारतातून नक्षलवाद संपवण्याचा ध्येयामध्ये गडचिरोलीतील शरणागती एक महत्त्वाचा दुवा मानला जात आहे.

४५ वर्षांपूर्वी १९८० मध्ये नक्षलवादाने महाराष्ट्रात कशा प्रकारे प्रवेश केला, याबाबत एनडीटीव्हीचे कार्यकारी संपादक जीतेंद्र दीक्षित यांचं पुस्तक ट्रबल शूटरमधील काही भाग...

पश्चिम बंगालच्या नक्षलबाडी आंदोलनाने भारतातील अनेक भागांमध्ये अशा प्रकारच्या आंदोलनांना जन्म दिला. बिहार, मध्य प्रदेश, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यांवर या आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम झाला. इतर काही राज्यांमध्येही नक्षलवादी चळवळीचं अस्तित्व जाणवत होतं. महाराष्ट्रातील गडचिरोलीतही नक्षलवादी चळवळ वाढत होती. या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांना लागते. गडचिरोलीतील सामाजिक-आर्थिक स्थिती सशस्त्र संघर्षासाठी अनुकूल होती. येथील निवासी मुख्यत: आदिवासी होते आणि जंगलातील उत्पादनांवर अवलंबून होते प्रामुख्याने आदिवासी असलेले आणि वन उत्पादनांवर अवलंबून असलेले रहिवासी, तेंदूपत्ता आणि बांबू कंत्राटदार आणि सरकारी अधिकारी यांच्याकडून त्रास सहन करत होते. कंत्राटदार येथील गावकऱ्यांना तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी आणि बांबू तोडण्यासाठी मजूर म्हणून वापरत करून घेत होते. परंतु त्यांना खूप कमी वेतन दिलं जात होतं. वन विभागाकडून विविध कायद्यांचा हवाला देत आदिवासींना जंगलातील संसाधनांचा उपयोग करण्यापासून रोखलं जात होतं.

ब्रिटीश शासनादरम्यान एक असाही नियम होता की, आदिवासी जमीन केवळ कोणा आदिवासी व्यक्तीला विकू शकत होती. मात्र स्वातंत्र्यानंतर धनाढ्य जमीनदार आणि सावकाऱ्यांनी जमिनीचा मोठा भाग खरेदी केला. सरकारी अधिकारी भ्रष्ट्राचार करीत होते आणि आदिवासी महिलांचंही लैंगिक शोषण केलं जात होतं.

Who is Bhupati :  सर्वात मोठं आत्मसमर्पण, 10 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा म्होरक्या भूपती कोण आहे?

नक्की वाचा - Who is Bhupati : सर्वात मोठं आत्मसमर्पण, 10 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा म्होरक्या भूपती कोण आहे?

अशी झाली नक्षलवाद आंदोलनाची सुरुवात...

आंध्रप्रदेशातील पिपल्स वॉर ग्रुपचं गठनामुळे गडचिरोलीत नक्षल आंदोलनाची सुरुवात केली. वारंगलचे एक हिंदी शिक्षक कोंडपल्ली सीतारामय्या यांच्यावर कम्युनिस्ट विचारधारेचा प्रभाव होता. ते चारू मजूमदार यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी) मध्ये सामील झाले. मजूमदार यांच्या मृत्यूनंतर पार्टी कमकुवत झाली. त्यानंतर सीतारामय्या सीपीआय (ML) मधून वेगळं होत, एप्रिल १९८० मध्ये PWG ची स्थापना केली. PWG ने निवडणुकीचं राजकारण नाकारलं आणि भारतीय सरकारविरोधात सशस्त्र संघर्ष सुरू केला. सीतारामय्या यांनी दल तयार केले. पाच ते दहा तरुणांचा छोटा समूह PWG चे ध्येय पूर्ण करण्यासाठी काम करीत होता. दोन महिन्यानंतर जून 1980 मध्ये असे सात दल महाराष्ट्रातील वन विभागात दाखल झाले. तर इतर दलांना मध्य प्रदेशात पाठविण्यात आले.

Gadchiroli News: नक्षल्यांचा म्होरक्या भूपतीचं समर्पण PM मोदी- शाहांच्या रणनीतीचं यश: देवेंद्र फडणवीस

नक्की वाचा - Gadchiroli News: नक्षल्यांचा म्होरक्या भूपतीचं समर्पण PM मोदी- शाहांच्या रणनीतीचं यश: देवेंद्र फडणवीस

गडचिरोलीमध्ये प्रवेश करणाऱ्या दलाचं नेतृत्व 23 वर्षीय पेड्डिशंकर करीत होता. पेड्डिशंकर आंध्र प्रदेशाच्या बेल्लमपल्ली जिल्ह्याचा होता. त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर बस क्लिनरचं काम सुरू केलं, मात्र शिक्षण सुरू ठेवलं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो रेडिकल स्टुडेट्स युनियनचा सदस्य बनला आणि विविध सामाजिक आंदोलनात भाग घेऊ लागला. त्याने कोळसा मजुरांचा मुद्दा उपस्थित केला आणि अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी स्थायी नोकरीच्या मागणीसाठी १८ दिवसांपर्यंत मोठं आंदोलन पुकारलं. १९७७ मध्ये त्याने क्राउड फंडिगच्या माध्यमातून आपल्या भागात एक पुस्तकालय सुरू केलं आणि चोरीच्या प्रकरणातून दोन हात करण्यासाठी तरुणांचा एक देखरेख समूह तयार केला.

१९७८ मध्ये एका कोळसा खाण अधिकाऱ्याने राजेश्वरी नावाच्या एका महिलेवर बलात्कार करून हत्या केली होती. पेड्डिशंकरने स्थानिक पोलीस स्टेशनाल घेराव घालून आंदोलन केले होते. त्यावेळी आक्रमक झालेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. ज्यात दोघांचा मृत्यू झाला होता. पेड्डिशंकर विरोधात दरोडा, पोलिसांची शस्त्रे हिसकावणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तो भूमिगत झाला होता. त्यानंतर पेड्डिशंकरने नक्षलवाद्यांना सहकार्य करण्यास सुरुवात केली. काही कालावधीतच त्याला महाराष्ट्र नक्षल आंदोलनाचा प्रभारी बनवण्यात आलं. २ नोव्हेंबर १९८० रोजी चार साथिदारांसह तो महाराष्ट्र-आंध्र प्रदेश बॉर्डरवजवळ मोइनबिनपेत्रा गावात शरणागती पत्करण्यासाठी आला होता. महाराष्ट्र सरकारला गुप्त माहिती मिळाली होती की, नक्षलवादी आंदोलनाने चंद्रपूर जिल्ह्यातही जम पकडला आहे. त्यामुळे तिथे राज्य राखीव दलाच्या (SRP) दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

एका सावकाराच्या नोकराला गावातील पेड्डिशंकरच्या उपस्थितीबाबत माहिती मिळाली आणि त्याने तातडीने गस्त घालणाऱ्या एसआरपी पथकाला माहिती दिली. सूचना मिळताच SRP टीमने कारवाई केली आणि काही मिनिटात पेड्डिशंकर आणि त्याच्या सहकाऱ्यांना घेराव घातला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समूहाला आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आलं. मात्र ते गावाबाहेरील ज्वारीच्या शेतात लपून बसले आणि पोलिसांवर गोळीबार करू लागले. पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत पेड्डिशंकर मारला गेला. त्याच्यासोबत असलेले चार सहकारी प्राणहिता नदीच्या दिशेने पळून गेले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी १२ बोअरची बंदूक, प्रथमोपचार किट आणि रेशनच्या सामानासह नक्षलवादी साहित्य जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला. यावेळी पोलिसांना "पीपल्स वॉर" नावाचे एक मासिक देखील सापडले.

या चकमकीनंतर मोठा गोंधळ झाला. काही मानवाधिकार कार्यकऱ्यांनी या चकमकीच्या तपासासाठी तथ्य शोध समितीचं गठण केलं. पेड्डिशंकरचा मृत्यू  पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात नाही तर त्याची हत्या करण्यात आली. पेड्डिशंकर याच्यावर मोकळ्या मैदानात गोळी झाडण्यात आली होती. एका गावकऱ्याने पेड्डिशंकरला पोलिसांनी गोळी झाडताना पाहिलं होतं आणि चकमकीबाबतही पोलिसांच्या रिपोर्टमध्ये विसंगती होती. ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासात नक्षलवादी आणि पोलिसांमधील पहिली चकमक मानली जाते. पेड्डिशंकरची कहाणी संपली असली तरी यामुळे एका अशा युगाची सुरुवात झाली, ज्यामुळे हिरवागार दंडकारण्याचं जंगल लाल रंगाने भरून गेलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com