जाहिरात

Fake Paneer : बाजारातील बनावट पनीर कसं ओळखाल? 'या' तीन गोष्टी लक्षात ठेवा!

ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी अधिक सजगपणे खरेदी करणं आवश्यक आहे. त्यामुळे बाजारात विकलं जाणारं भेसळयुक्त पनीर कसं ओळखावं याबाबत डेअरी तज्ज्ञ मोहन काळबांडे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

Fake Paneer : बाजारातील बनावट पनीर कसं ओळखाल? 'या' तीन गोष्टी लक्षात ठेवा!

संजय तिवारी, प्रतिनिधी

Fake Paneer : बाजारात पनीरची मोठी विक्री होते. मात्र पनीरच्या नावाखाली भेसळयुक्त किंवा बनावटी पनीर विकलं जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बनावट असल्याच्या संशयावरून नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने 239 किलो पनीर नष्ट केलं आहे. गुढीपाडवा आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात ही मोहीम राबवण्यात आली होती. नाशिकच्या अंबड परिसरातील साई एन्टरप्राईजेस या कारखान्यावर छापा टाकण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार हे तब्बल 47 हजार 800 रुपये किमतीचं पनीर होतं. यांसारखी अनेक प्रकरण महाराष्ट्रातून समोर आली आहेत. ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी अधिक सजगपणे खरेदी करणं आवश्यक आहे. त्यामुळे बाजारात विकलं जाणारं भेसळयुक्त पनीर कसं ओळखावं याबाबत डेअरी तज्ज्ञ मोहन काळबांडे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

1. भेसळयुक्त किंवा बनावट असणारे पनीर नक्की काय असते?
ते बहुधा पांढरे अनालोग चीज असते. अनालोग चीज स्किम्ड मिल्क पावडर किंवा स्टार्च आणि पाम ऑइल यांना व्यवस्थित मिक्स करून तयार केलं जातं. कित्येकवेळा त्यात चुना आणि डिटर्जंट देखील मिसळलेले असते. कित्येक ठिकाणी त्यात चुना आणि हानीकारक केमिकल्स मिळवून बनवले जाते.

Health Tips : चिकन, मटनपेक्षा देखील 'या' डाळीमध्ये जास्त प्रोटीन, 6 फायद्यांसाठी करा आहारात समावेश

नक्की वाचा - Health Tips : चिकन, मटनपेक्षा देखील 'या' डाळीमध्ये जास्त प्रोटीन, 6 फायद्यांसाठी करा आहारात समावेश

2. बनावट पनीर कसं ओळखायचं?
चांगल्या प्रतीच्या पनीर प्रमाणे याला दुधाची चव येत नाही. रबर चघळल्यासारखे वाटते. त्यात प्रोटीन कमी असतं पण ऑईलमुळे फॅट अधिक असू शकते. अनालॉग चीज म्हणजे आपण सरळ सरळ तेल खाण्यासारखं आहे. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढतं. लहान मुलं ते चवीने खातात. या व्यतिरिक्त बरेच  केमिकल्स टाकले जाण्याची शक्यता आहे.  

शुद्ध दुधापासून बनवलेल्या असली पनीरला दुधाचा गंध आणि चव असते. नकली पनीरला यापैकी काहीही नसतं. चांगल्या प्रतीचं पनीर हलकं पिवळसर असू शकतं. मात्र बनावटी पनीर केमिकलमुळे पांढरे शुभ्र दिसतं. दुर्दैवाने ग्राहक पांढरे शुभ्र रंग पाहून ते असली समजतो.

चाचणी 1. उकळण्याची चाचणी
पाण्यात पनीर उकळल्यास चांगल्या प्रतीचं पनीर उकळत्या पाण्यात विरघळून पाण्याचा रंग पांढरा होतो. बनावटी पनीर विरघळत नाही.

चाचणी 2. आयोडीन चाचणी
पनीरचा छोटा तुकडा घेऊन त्यावर आयोडीन सोल्युशन टाकावे. टाकलेल्या द्रवाचा रंग गडद निळसर असा बदलायला सुरुवात झाल्यास ते नक्की बनावटी पनीर आहे, असे समजावे. स्टार्चमुळे रंगात बदल घडून येतो. टाकलेल्या द्रवाने पनीरचा रंग बदलला नाही तर ते चांगल्या प्रतीचं आहे, असं समजावे.

Health Tips : झोपण्याआधी मुलांना दूध देणे हानिकारक ठरु शकते, काय आहेत कारणे?

नक्की वाचा - Health Tips : झोपण्याआधी मुलांना दूध देणे हानिकारक ठरु शकते, काय आहेत कारणे?

चाचणी 3. उकळण्याची चाचणी
उकळल्यावर चांगल्या प्रतीचं पनीर बऱ्यापैकी विरघळते. मात्र बनावटी पनीर किंचित विरघळते आणि उलट जाड बनते, सॉलिडिफाय होते. 

यामागे काय इकॉनॉमिक्स आहे ते जाणून घेऊया...
मध्य भारतात नकली पनीर विरोधात मोहीम उघडलेले डेअरी क्षेत्रातील जाणकार प्रकाश बिसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक किलो अनालॉग चीज बनविण्यासाठी अंदाजे 160 रुपये खर्च येते. ते 200 ते 220 रुपये प्रति किलो अनालॉग चीज म्हणून विकले जाते. मात्र त्यावर सप्लायरकडून तसे स्टिकर चिकटवलेले असते. मात्र, ते दिसायला अगदी पनीरसारखे असल्याने विक्रेते स्टिकर काढून ते मिल्क पनीर असल्याचे सांगून 360 रुपये प्रति किलो विकतात.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: