जाहिरात
This Article is From May 21, 2024

अभिनंदन! बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल; मुलींनी मारली बाजी

HSC Board Exam: राज्यातील इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

अभिनंदन! बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल; मुलींनी मारली बाजी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit - Canva)

12th Results News: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा इयत्ता बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. सर्वाधिक 97.51 टक्के निकाल कोकण विभागाचा तर सर्वाधिक कमी 91.95 टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. यंदा 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले.  

कोकण विभाग अव्वल

सर्व विभागीय मंडळातून कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा निकाल 97.52 टक्के तर सर्वाधिक कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल 91.15 टक्के इतका लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 95.44 टक्के लागला असून मुलांचा निकाल 91.60 टक्के इतका लागला आहे.  

(नक्की वाचा: तुमचा मुलगा 25व्या वर्षी होईल कोट्यधीश, 'या' पद्धतीनं करा बचतीला सुरुवात)

विभागनिहाय निकाल 

 कोकण विभाग 97.51 टक्के
 नाशिक विभाग 94.71 टक्के
 पुणे विभाग 94.44 टक्के
 कोल्हापूर विभाग 94.24 टक्के
 छत्रपती संभाजीनगर विभाग 94.08 टक्के
 अमरावती विभाग 93 टक्के
 लातूर विभाग 92.36 टक्के
 नागपूर विभाग 92.12 टक्के
 मुंबई विभाग 91.95 टक्के

(नक्की वाचा: Sudha Murty Motivational Quotes: तुमची मुले गाठतील प्रगतीचे शिखर, फॉलो करा सुधा मूर्तींचे हे प्रेरणादायी विचार)

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन

इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम आणि आयटीआय (ITI) या शाखांसाठी एकूण 14 लाख 33 हजार 371 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. 

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 45 हजार 448 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 45 हजार 083 विद्यार्थी परीक्षा दिली आणि त्यापैकी 22 हजार 463 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्याच्या निकालाची टक्केवारी 49.82 इतकी आहे.

कुठे पाहता येईल निकाल?

दुपारी 1 वाजता इयत्ता बारावीचा निकाल ऑनलाइन पाहता येईल.
रिझल्ट पाहण्यासाठी वेबसाइट :
1. mahresult.nic.in 
2. http://hscresult.mkcl.org 
3. www.mahahsscboard.in 
4. https://results.digilocker.gov.in 
5. http://results.targetpublications.org 

मंगळवारी (21 मे 2024) निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजमधून निकालाची प्रत मिळेल. 

VIDEO: काश्मीर नाहीतर पुण्यात केशरची यशस्वी शेती

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com