मंगेश जोशी, जळगाव:
Jalgaon Crime: घटस्फोटानंतर प्रेम विवाह केल्याच्या रागातून भुसावळ येथे 25 वर्ष तरुणाला बेदम मारहाण करत त्याची नग्न धिंड काढत तसेच रुमालाने गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेतन दिलीप जंगले असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या पत्नीलाही जबरदस्ती पळवून नेण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलींच्या नातेवाईकांसह 5 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भुसावळ शहराजवळ असलेल्या खडका गावातील चेतन जंगले या तरुणाने घटस्फोटानंतर दुसऱ्या मुलीशी प्रेम विवाह केला होता. हा तरुण भुसावळ येथे त्याच्या मामाच्या घरी थांबला असताना त्या ठिकाणी मुलीच्या नातेवाईकांनी येऊन त्याला धनकवले व त्याच्या पत्नीला मारहाण केली.
Rupali Chakankar: कॅप्टन खरातची संगत भोवणार! रुपाली चाकणकरांना आणखी एक दणका? मोठी अपडेट समोर
त्यानंतर तरुणाला पकडून रुमालाने गळा आवळण्याचा प्रयत्न केल्याने तरुणाने जीव वाचण्यासाठी पळण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पुन्हा पकडून बेदम मारहाण करत त्याचे कपडे फाडले व नग्न अवस्थेत मारहाण केली तर एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्याला गाडीवर बसवून खडका गावात नेत तेथे बस स्थानक ते घरापर्यंत पायी धिंड काढून तरुणाच्या आई-वडिलांनाही व नातेवाईकांना मारहाण करत धमकवण्यात आले.
दरम्यान, या घटनेत तरुण हा जखमी झाला असून त्याच्या हाताला दुखापत झाली असल्याची माहिती आहे व त्याच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून इतर संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Ashok Kharat: खळबळजनक खुलासा! कॅप्टन खरातकडे तब्बल 52 सातबारे! तहसीलदार, बडे अधिकारी अडकणार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world