
जळगावामध्ये बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. रावेर येथे घडलेल्या घटनेमुळे स्थानिक मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत आहेत. सावत्र बापाने गळा दाबून तीन वर्षीय मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेलसवाडी येथील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ही घटना उघड झाली. या प्रकरणी मुलीची आई आणि सावत्र बापाविरोधात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(नक्की वाचा: केक भरवण्यावरून वाद, मित्रच मित्राला भिडला; भयंकर शेवट)
बेलसवाडी येथील रहिवासी असणारी माधुरीचा मध्य प्रदेशातील वारोली येथील भरत म्हसानेशी वर्ष 2017मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर माधुरी आणि भरतला एक मुलगा-एक मुलगी अशी दोन अपत्यं झाली होती. पतीशी सतत त्यांनी वाद होत असल्याने माधुरी मागील वर्षभरापासून माहेरीच राहत होती. तीन महिन्यापूर्वी माधुरीने रावेरमधील प्रियकर अजय घेटेशी विवाह केल्याची माहिती समोर आहे. दुसऱ्या लग्नानंतर माधुरी आपल्या दोन्ही मुलांसह अजय घेटेसोबतच राहत होती.
यादरम्यान शुक्रवारी (31 मे 2024) अजय घेटेने आपल्या सावत्र मुलीला काठीने बेदम मारहाण केली आणि गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. हत्येचा प्रकार लपवण्यासाठी अजय मुलीचा मृतदेह माधुरीच्या माहेरी घेऊन गेला व आजारपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचत त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पण घडलेला प्रकार ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी माधुरीचा पहिला पती भरत म्हसाने आणि पोलिसांनाही दिली.
(नक्की वाचा: गर्लफ्रेंड्सच्या हौसेमौजेसाठी प्रेमवीरांचा खटाटोप, उचललं भलतचं पाऊल, पुढे जे झाले ते...)
यानंतर भरत म्हसानेने तडक बेलसवाडी गाठली. यावेळेस त्याला मुलीच्या गळ्यावर निशाण दिसल्याने संशय अधिक बळावला. भरतने आपल्या पाच वर्षीय मुलाला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, अजयनेच मुलीला मारल्याचे सत्य त्याने सांगितले. ग्रामस्थांच्या मदतीने भरत म्हसानेने आपल्या मुलीचा मृतदेह थेट अंतुर्ली पोलीस स्टेशनमध्ये नेला. तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी मुलीचा मृतदेह मुक्ताईनगरमधील शासकीय रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये मुलीचा मृत्यू गळा दाबूनच झाल्याचे निष्पन्न झाले.
(नक्की वाचा: मालेगाव पुन्हा हादरले! माजी नगरसेवकासह त्यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला, हाताची कापली बोटे)
या प्रकरणी मुलीची सख्खी आई माधुरी व सावत्र वडील अजय घेटे या दोघांविरोधात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी दिली आहे. पण अजयने सावत्र मुलीची हत्या का केली? याचा शोध पोलीस करताहेत.
VIDEO: मालेगावात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world