जाहिरात

हातात बनावट तलवारी, पाकिस्तानी गाणं अन् दहशतवाद्याचा फोटो; जालन्यात विद्यार्थ्यांच्या नृत्याचा धक्कादायक Video

जालना जिल्ह्यातील परतूर येथील 'किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल'च्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमादरम्यान शाळकरी मुलांनी हातात बनावट तलवारी घेऊन एका पाकिस्तानी गाण्यावर नृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हातात बनावट तलवारी, पाकिस्तानी गाणं अन् दहशतवाद्याचा फोटो; जालन्यात विद्यार्थ्यांच्या नृत्याचा धक्कादायक Video

लक्ष्मण सोळूंखे, प्रतिनिधी

Jalna News : जालना जिल्ह्यातील परतूर येथील 'किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल'च्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमादरम्यान शाळकरी मुलांनी हातात बनावट तलवारी घेऊन 'गुस्ताख-ए-नबी की एक सजा या पाकिस्तानी गाण्यावर नृत्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी दहशतवादी मुमताज कादरी याचे छायाचित्र प्रदर्शित करण्यात आल्याचं ही समोर आलं आहे. 

मुमताज कादरी याने पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या राज्यपालांची हत्या केली होती. कारण या राज्यपालांनी ईशनिंदेचा (ईशनिंदा एक असा कायदा आहे, ज्यात कोणताही धर्म, ईश्वर, धार्मिक ग्रंथ किंवा मान्यतेचा अपमान करणं, अनादर करणं किंवा दुखावण्याला दंडनीय गुन्हा मानला जातो)  आरोप असलेल्या आशिया बीबी या ख्रिश्चन महिलेच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. दरम्यान या शाळेमध्ये अशा प्रकारे पाकिस्तानी गाण्यावर नृत्याचं आयोजन केल्याने अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

नक्की वाचा - Kalyan News : क्रौर्याची परिसीमा! हुंड्यासाठी विवाहितेचं केलं टक्कल, कल्याणमधील संतापजनक घटना

शाळांमधून अतिरेकी विचारसरणीचा प्रसार केल्याचा आरोप...

ही शाळा CBSE बोर्डाशी संलग्न असल्याचं सांगितलं जात आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये अतिरेकी विचारसरणीचा प्रसार करत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या संस्थेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी NCPCR,  DGP Maharashtra, पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याची माहिती संस्था व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. बॅग राउंड स्क्रीनचा कॉन्ट्रॅक्ट हा बाहेच्या लोकांना दिलेला असतो. त्यामुळे त्यांनी स्क्रीन वर कुणाचा फोटो चालवला हे सांगता येत नसल्याची माहिती ही त्यांनी NDTV मराठीला दिली आहे. याप्रकरणी परतूर पोलिसांनी देखील संस्थाचालक तारीख सिद्धीकी यांची चौकशी करण्यास सुरुवात केल्याची माहिती ही पोलिसांकडून देण्यात आलीय...

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com