
अंधश्रद्धा निर्मुलन कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. पण कायदा अस्तित्वात असला तरी अंधश्रद्धा काही जाता जात नाही. ती ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे. अंधश्रद्धेतून एक मोठा प्रकार समोर आला आहे. त्यात पैशांचा पाऊस पाडण्याचं आश्वास दिलं होतं. 1 लाख दिले तर 6 कोटी मिळतील असं सांगितलं गेलं होतं. भोंदूबाबाच्या या भूलथापांना एक मुंबईतला निर्माता बळी पडला. पण हे सर्व करत असतानाचा भोंदूबाबा पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. ही घटना जालना जिल्ह्यात घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रतन आसाराम लांडगे हा जालन्यातल्या भक्तेश्वरनगर इथे राहतो. तो भोंगूबाबा आहे. जादूटोणा, मंत्रतंत्र करून तो लोकांना फसवत असतो. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील किशोर पंडीत शेवाळे या शेतकऱ्याला त्याने टोपी घातली होती. त्याच्या बरोबर त्याने शेवाळे यांचा पुतण्या यालाही गंडवलं होतं. 1 लाख दिले तर तुम्हाला 1 कोटी रुपयांचा पैशाचा पाऊस पाडून देतो असं या भोंदूबाबने सांगिंतलं होतं. त्यावर शेवाळे आणि त्यांचा पुतण्या याने विश्वास ठेवला.
ट्रेंडिंग बातमी - MNS Rada: चप्पल फेकली, झिंज्या ओढल्या, कानशिलात लगावली, महिलांची 'मनसे' दे दणा दण
आधी त्याने एक लाख दिले. पण पैशाचा पाऊस काय त्याने पाडला नाही. असं करत टप्प्या टप्प्याने त्याने शेवाळेंकडून जवळपास साडेपाच लाख रूपये घेतले. पण पैशाचा पाऊस काही पडला नाही. एक कोटी तर लांबची गोष्ट राहीली. आपली फवसणूक झाली आहे हे त्यांना लक्षात आले. त्यांनी याबाबत तक्रार दाखली केली. तेव्हा पासून पोलिस हे या भोंदूबाबाच्या मागावर होते. शेवटी पोलिसांनी त्याला जालना शहरातील भक्तेश्वरनगर इथून अटक केलं.
तिथे आणखी भयंकर प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. भोंदू बाबाच्या घरात त्यावेळी मुंबईतील निर्माता पदमनाभ जयप्रकाश राणे, विकास वसंत अनभवने, नारायण गजानन जोशी हे तीन जण ही आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांना ही एक लाखाचे सहा करोड रुपय करून देतो असं आमिष या भोंदू बाबानी दाखवलं होतं. त्याच्या घरातून पोलिसांनी जादूटोण्याचं साहित्या जप्त केलं आहे. शिवाय 1लाख 49 हजार रुपये ही जप्त केले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - Jejuri Accident : जेजुरीजवळ कार आणि टेम्पोचा भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू
भोंदू बाबा रतन आसाराम लांडगे याला शहरातील भक्तेश्वर नगर मधून अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध नरबळी जादुटोणा प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिवाय 19 लाख 8 हजार नोटेच्या आकाराचे कापलेले कोऱ्या कागदांचे बंडल जप्त करण्यात आले आहे. त्यातील एका गोणीमध्ये सोळा बंडलवर प्रत्येकी 500 रू दराच्या नोट लावलेले बंडल होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world