जाहिरात

EVMचे रडगाणे थांबवा, उमर अब्दुलांनी काँग्रेसला फटकारले; निवडणूक न लढण्याचा सल्ला दिला

पक्षांना मतदान व्यवस्थेवर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणूक लढवू नये. तुम्हाला ईव्हीएममध्ये समस्या असल्यास, त्याबाबत तुमची भूमिका एकसारखीच राहिली पाहिजे, असा सल्लाही अब्दुला यांनी यावेळी दिला. 

EVMचे रडगाणे थांबवा, उमर अब्दुलांनी काँग्रेसला फटकारले; निवडणूक न लढण्याचा सल्ला दिला

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने ईव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ईव्हीएममध्ये फेरफार होत असल्याचा आरोप करत राज्यासह दिल्लीमधील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावरुनच आता जम्मू- काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी  ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप करत काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. 

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स नेते उमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी ईव्हीएमवरील आरोप चुकीचे असल्याचे म्हणत काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली आहे. जिंकल्यानंतर ते ईव्हीएमला स्विकारतात आणि पराभव झाल्यानंतर ते ईव्हीएमला दोष देतात, असं  ते म्हणालेत. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले उमर अब्दुला?

जेव्हा तुम्हाला तेच ईव्हीएम वापरून संसदेत शंभरहून अधिक सदस्य मिळतात आणि तुम्ही तो तुमच्या पक्षाचा विजय म्हणून साजरा करता, तेव्हा काही महिन्यांनंतर तुम्ही हे ईव्हीएम आवडत नाही, असं म्हणू शकत नाही. कारण आता निवडणुकीचे निकाल आम्हाला हवे तसे येत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. 

हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने ईव्हीएम आणि निवडणूक निकालांच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली आहे. निवडणुकीत बॅलेट पेपरवर परतण्याची मागणी केली आहे. त्यावर ते म्हणाले की, जर पक्षांना मतदान व्यवस्थेवर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणूक लढवू नये. तुम्हाला ईव्हीएममध्ये समस्या असल्यास, त्याबाबत तुमची भूमिका एकसारखीच राहिली पाहिजे, असा सल्लाही अब्दुला यांनी यावेळी दिला. 

ट्रेंडिंग बातमी - प्रादेशिक समतोल ते नव्या चेहऱ्यांना संधी! महायुतीच्या कॅबिनेटची 'ही' आहेत 10 वैशिष्ट्ये

दरम्यान, यावेळी बोलताना उमर अब्दुला यांनी दिल्लीमधील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचेही कौतुक केले. ल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात जे घडत आहे ते खूप चांगली गोष्ट आहे. मला विश्वास आहे की नवीन संसद भवन बांधणे ही एक चांगली कल्पना होती. आम्हाला संसदेच्या नवीन इमारतीची गरज होती, जुन्या इमारतीची उपयुक्तता गमावली आहे, असं ते म्हणाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com