जाहिरात

Jayakumar Gore : 'माझी निर्दोष मु्क्तता झाली तरीही...', संजय राऊत, रोहित पवार आणि त्या युट्यूब चॅनलविरोधात हक्कभंग प्रस्ताव

माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले असून यामुळे माझी बदनामी झाल्याचं गोरेंनी आपल्या प्रस्तावात म्हटलं आहे. 

Jayakumar Gore : 'माझी निर्दोष मु्क्तता झाली तरीही...', संजय राऊत, रोहित पवार आणि त्या युट्यूब चॅनलविरोधात हक्कभंग प्रस्ताव

Jayakumar Gore : भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी 5 मार्च रोजी धक्कादायक आरोप केले होते. जयकुमार गोरे यांनी महिलेचा विनयभंग केला असून त्यांनी आपले विवस्त्र फोटो पीडित महिलेला पाठवल्याचा धक्कादायक आरोप संजय राऊतांनी केला होता. दरम्यान या प्रकरणात आज अधिवेशनादरम्यान गोरेंनी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले असून यामुळे माझी बदनामी झाल्याचं गोरेंनी आपल्या प्रस्तावात म्हटलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत, रोहित पवार, लय भारी वेब पोर्टल संपादक तुषार खरात यांच्यावर हक्कभंग मांडण्यात आला. संजय राऊत यांनी खोटी माहिती छापली, बदनामी केली. त्याचवेळी रोहित पवार यांनी सभागृहाबाहेर याबाबच विधान केलं. त्याशिवाय माझ्याबद्दल चुकीची माहिती दाखविण्यात आली आहे. न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. तरीही माझ्याविरोधात चुकीची, बिनबुडाची वक्तव्य करण्यात आली, असं म्हणत जयकुमार गोरे यांनी विधानसबेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. याशिवाय एका युट्यूब चॅनेल विरोधात हक्कभंग मांडण्यात आला आहे. 

Bhaiyyaji Joshi : 'मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही', संघाच्या वरिष्ठ नेत्याच्या वक्तव्याने वाढ उफाळणार?

नक्की वाचा - Bhaiyyaji Joshi : 'मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही', संघाच्या वरिष्ठ नेत्याच्या वक्तव्याने वाढ उफाळणार?

2017च्या जिल्हा न्यायालय साताऱ्यात दाखल प्रकरणाचा आढावा घेत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या बातम्यांमुळे मला टीकेला तोंड द्यावं लागलं. या गुन्ह्यात न्यायालयाने माझी 2017 मध्ये निर्दोष मुक्तता केली आहे. त्या प्रकरणाशी संबंधित मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे. माझा व सभागृहाचा अवमान केला आहे. अधिवेशन सुरू असताना रोहित पवार यांनी हा प्रकार केला. त्यांच्या विरोधात मी हक्कभंग मांडत आहे, असं जयकुमार गोरे यांनी सदनात सांगितलं. 

त्या युट्यूब चॅनलविरोधातही हक्कभंगाचा प्रस्ताव..
जयकुमार गोरे यांनी सदनात सांगितल्यानुसार, त्या युट्यूब चॅनलकडून माझी बदनामी केली जात आहे. या चॅनलकडून माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे. हे युट्यूब चॅनल आणि तुषार खरात यांच्याविरोधात हक्कभंग मांडत असल्याचं गोरे यावेळी म्हणाले.