2 months ago
रायगड:

रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आज 8 जुलैपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे. रायगड किल्ल्यावर ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे ७ जुलै रोजी काही पर्यटक येथे अडकून पडले होते. शेवटी प्रशासनाच्या पुढाकाराने त्यांची सुटका करण्यात आली आहे. अद्यापही रायगडावर पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने रायकड किल्ला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेल्या पर्यटकांना रोपवेदेखील पुढील आदेशपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. प्रशासनाकडून किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे बंद करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.