जाहिरात
2 months ago
मुंबई:

रविवारी 14 जुलै रोजी कोकण रेल्वे मार्गावरील (Kokan Railway) खेड-दिवाण खवटी दरम्यान रेल्वे रूळावर दरड कोसळली. यानंतर कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. 14 तासांनंतरही कोकण रेल्वेची (Kokan Railway not working) वाहतूक ठप्पच आहे. कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्यानंतर एसटीने प्रवाशांना पनवेलपर्यंत प्रवाशांना सोडण्यात येत आहे. खेड रेल्वे स्थानकातून कालपासून एसटी गाड्यांचं नियोजन करण्यात आलं. आज 10 बस खेड स्थानकातून सोडण्यात आल्या आहेत. 40 बस रत्नागिरी तर 20 बस चिपळूण स्थानकातून सोडण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत लोणावळ्यात तब्बल 169 मिलीमीटर पावसाची नोंद

मागील 24 तासांत लोणावळ्यात तब्बल 169 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना पावसात भिजण्याचा आनंद घेण्याची जणू काही पर्वणी मिळाली आहे. मात्र या पावसामुळे लोणावळ्यातील अनेक धरणातील पाणलोट क्षेत्रात वाढ झाली असून टाटा धरण भरू लागले आहे. मागच्या आठवड्यात येथील पाणीसाठा खालावला होता.

शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पत्रकार परिषद LIVE

छगन भुजबळ नाराज आहेत का? काय म्हणाले तटकरे?

अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.  वंचितसह इतर पक्षांसोबत ही तिसरी आघाडी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. तिसऱ्या आघाडीच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ नाराज असल्या दरम्यान छगन भुजबळ नाराज नसल्याची प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. 

NIA च्या अटकेत असलेल्या ज्योती जगताप यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच

NIA च्या अटकेत असलेल्या ज्योती जगताप यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच

जगताप यांना अंतरिम जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

अंतरिम जामिनाच्या प्रकरणावर नाही तर मुख्य प्रकरणावर सुनावणी करावी लागेल - सुप्रीम कोर्ट

सुनावणीसाठी पुढची तारीख लवकरच कोर्ट देणार

चंद्रपुरात अवघ्या तासाभरात 100 मिमी पावसाची नोंद

पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला मात्र चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडलाच नाही. काल संध्याकाळी पावसाने शहराला झोडापून काढले. अवघ्या तासाभरात 100 मि.मी.पावसाची नोंद झाली. ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील रस्ते जलमय झाले तर सखल वस्तीत पाणी शिरले. पहिल्या एका तासातच 100 मिमी पाऊस पडला. 2 तासात 119 मिमीची नोंद झाली. दर वर्षी अशा  पावसाच्या घटनात वाढ होत आहे. शहरीकरण, प्रदूषणण यामुळे तापमान वाढ झालेली आहे. परिणामी हवामानात मोठे बदल झालेत. या अर्बन हिटमुळे पाऊस शहरात जास्त आणि ग्रामीण भागात कमी पडतो. हे प्रकार महाराष्ट्रात सर्व शहरात घडत आहेत, असे अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

छगन भुजबळ - शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

छगन भुजबळ - शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

खामगांव येथून विठ्ठल एक्सप्रेस रवाना, पहिल्या फेरीत 1300 भाविक निघाले पंढरपूरला...

खामगांव येथून विठ्ठल एक्सप्रेस रवाना ..

पहिल्या फेरीत 1300 भाविक निघाले पंढरपूरला...

आषाढ महिना लागला की, विठ्ठल भक्तांची पावले पंढरीच्या दर्शनासाठी वळू लागतात. दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांच्या सोयीसाठी खामगाव येथून विठ्ठल दर्शन एक्सप्रेसचे आयोजन करण्यात येत असते.  त्याची पहिली फेरी खामगाव रेल्वे स्थानकावरून रवाना झाली आहे. तर दुसरी फेरी 17 जुलै रोजी खामगाव येथून पंढरपूरकडे रवाना होणार आहे.. यंदा 18 बोगींच्या विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसमध्ये जनरल बोगी सह आरक्षित,वातानुकूलित आणि विशेष म्हणजे दिव्यांगांना सुद्धा यामधे बसण्याची व्यवस्था केली आहे. एकूण 1311 भाविकांना घेऊन ही विठ्ठल दर्शन एक्स्प्रेस खामगाव येथून रवाना झाली असून पहिल्या फेरीमध्ये रेल्वेला एकूण सात लाख 5 हजार 415 रुपये इतके उत्पन्न मिळविले आहे. 

रामेश्वर धबधबा खळखळून वाहू लागला

बीडमध्ये सुरू असलेल्या पावसाने पाटोदा तालुक्यात असलेल्या सौताडा येथील रामेश्वर धबधबा खळखळून  वाहू लागला आहे. गेल्या वर्षी हा धबधबा कोरडा होता, परंतु दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने हा धबधबा ओसंडून वाहताना पाहावयास मिळतोय. बीड जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण म्हणून रामेश्वर धबधब्याची ओळख आहे. तीनशे फुट उंचीच्या धबधब्यावरुन कोसळणारे पाणी पर्यटकाना भुरळ घालत असते.



मुंबई-कोकणाला अलर्ट

Switch To Dark/Light Mode
Previous Article
अंबरनाथमध्ये 6 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग, 23 वर्षाच्या नराधमाला चोपचोप चोपले
Live Update : शरद पवार यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पत्रकार परिषद
Minister Shambhuraje Desai orders Satara police to Take strict action against teasing
Next Article
टवाळखोरी कराल तर थेट धिंड निघणार, 'या'नेत्याने दिले थेट आदेश