महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 6 दिवस उलटून गेले आहेत. विधानसभेचा कार्यकाळही 26 नोव्हेंबरला संपला आहे. सरकार कोण बनवणार हेही ठरले आहे. पण मुख्यमंत्री कोणाला करायचे हे ठरलेले नाही.मुख्यमंत्रिपदाची निवड करताना जातीय समीकरण लक्षात ठेवले जाईल, असे मानले जात आहे. 288 जागांच्या विधानसभेत मराठा समाजाचे आमदार मोठ्या संख्येने आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. अशा स्थितीत भाजपला सर्व समीकरणे एकत्र बघायची आहेत. मात्र, या सगळ्यानंतरही फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे.
Aditya Thackeray: अमावस्या- पोर्णिमेला करावी लागते अशी कोणती शेती आहे: आदित्य ठाकरे
शपथविधी होणार पण मुख्यमंत्री कोण ? एका पक्षाच्या अध्यक्षाने तारीख सांगितली हे खर म्हणजे राज्यपालाने सांगितले पाहिजे हे कधी राज्यपाल झाले. एवढा महत्वाचा दिवस असताना काळजीवाहू मुख्यमंत्री अस गायब होतात? हे किती योग्य आहे? ब्रेक म्हणजे किती दिवस? सर्व साधारण माणसाकडे हॅलिकाॅप्टर नाही.
अशी कोणती शेती आहे जी प्रत्येक आमवस्या पोर्णिमेला करावी लागते हा महत्वाचा प्रश्न. याने काही चित्र बदलणार आहे. आज तिथी काय आहे?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
Mumbai Water Supply: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! 1 आणि 2 डिसेंबरला पाणी कपात
बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये आज दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी तांत्रिक बिघाड झाला आहे. सदर दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. दिनांक ०१ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०२ डिसेंबर २०२४ रोजी दुरुस्ती काम सुरू राहणार आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबई शहर व उपनगरांसह बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. यामुळे दिनांक ०१ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०५ डिसेंबर २०२४ या कालावधीत पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, अशी विनम्र विनंती महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Arvind Kejriwal Attack: 'आप' नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला; अंगावर द्रव पदार्थ फेकला
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर द्रव पदार्थ फेकल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर हल्लेखोराला मारहाण करण्यात आली आहे.
Baba Adhav Protest: उद्धव ठाकरेंची भेट, बाबा आढाव यांनी उपोषण सोडले
विधानसभा निवडणुकीत गडगड झाल्याचा संशय व्यक्त करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे पुण्यामध्ये आत्मक्लेष उपोषण सुरु आहे. या आंदोलनस्थळी आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. या भेटीनंतर बाबा आढाव यांनी आपले हे उपोषण सोडले
Baba Adhav Protest: निवडणुकीत गडबड झाल्याचा आम्हाला संशय: बाबा आढाव
या निवडणुकीत राज्याच्या तिजोरीचा खुळखुळा झाला. निवडणुका तोंडावर ठेऊन योजना आणल्या. सरकारी तिजोरीतून पैशांचे वाटप झाले. महाराष्ट्रात मताचा अधिकार आहे तर सन्मानाने मरण्याचाही हक्क पाहिजे. त्यासाठी पेन्शन द्या. निवडणुकीत गडबड झाल्याचा आम्हाला संशय आहे. निवडणुकीत कटेंगे तो बटेंगे हा मुद्दा अजब होता, असं बाबा आढाव म्हणालेत.
Raosabeb Danve: 'जाहिररित्या EVM हॅक करुन दाखवा...', रावसाहेब दानवे
तीन पक्ष सरकार बनवतं तेव्हा समन्वय आवश्यक असतो आमच्या समन्वय आहे. आमचा नेता निवडला जाईल. तिन्ही नेते निवडल्यानंतर मुख्यमंत्री निवडला जाईल कोणताही विलंब नाही. आमच्या पक्षात वाद नाही. जो निर्णय देतील आम्हाला मान्य असणार आहे. निश्चित तारीख अद्याप पक्ष श्रेष्टींनी आम्हाला कळवली नाही. आमच्यात कोणतीही रस्सीखेच नाही. खाते वाटप, नेता निवडीवरून आमच्यात कोणतेही वाद नाहीत. बाबा आढाव ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा आम्ही आदर करतो..
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला चर्चेचं निमंत्रण
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला चर्चेचं निमंत्रण
3 डिसेंबरला चर्चेला येण्याचं निमंत्रण
अचानक मतदानाचा टक्का कसा वाढला, असा सवाल काग्रेसनं उपस्थित केला होता.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील फेरफारच काँग्रेसचा आरोप
सर्व गोष्टी पारदर्शक झाल्याचा निवडणूक आयोगाचा दावा
आयोगाकडून काँग्रेसला सर्व कायदेशीर समस्यांच निरसन केलं जाईल, अस आश्वासन दिलं
सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तार यांच्याविरोधात फौजदारी याचिका दाखल
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सिल्लोड सोयगाव मतदारसंघ 104 मध्ये उमेदवार अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या विरिधात सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे.सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली आणि पुणे येथील डॉ. अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्या नामनिर्देशन पत्र सोबत सादर केलेल्या शपथबद्ध शपथपत्रावर मतदान पूर्वीच लेखी आक्षेप सादर केला होता. परंतु सदर अक्षेपावर निवडणूक आयोगाने अध्याप पर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे शपथपत्रात खोटी, भ्रामक आणि दिशाभूल माहिती देणे लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 कलम 125अ नुसार गुन्हा आहे.
तक्रारीबाबत आयोगाने कोणतीच कारवाई न केल्यामुळे सदर प्रकरणात सिल्लोड दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात फौजदारी याचिका क्र. 278/2024 दाखल केली आहे. भारतीय न्याय संहिता 2023 कलम 210, 223, लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 कलम 125अ व मानव संरक्षण अधिकार अधिनियम 1993 कलम 30 अन्वये सदर याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
ईव्हीएमविरोधात पुण्यात बाबा आढाव यांच्या आंदोलनाला राज्यभरातून समर्थन
ईव्हीएमविरोधात पुण्यात बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केला आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणाहून समर्थन मिळत आहे. कोल्हापुरातील आज आणि भारतीय लोक या संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं. ईव्हीएम हटाव अशी घोषणाबाजी या आंदोलनात करण्यात आली. एखाद्या मशीनमध्ये घोटाळा करून विजय मिळवणं सोपं असल्याचा आरोप देखील यातून करण्यात आला. या आंदोलनात कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर हे देखील सहभागी झाले होते. हे एक आंदोलन नसून ही लोक चळवळ निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया देखील या सामाजिक कार्यकर्त्यांकडून देण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरातील बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले
पिंपरी चिंचवड शहरातील बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले. शहरातील मोशी उपबाजार पेठेत भाजीपाल्याची आवक घटल्याने हे दर वाढलेले दिसत आहेत. सध्या मेथी 25 ते 30 रुपये जुडी, कोथिंबीर 20, कांदापात 30, मुळा 40 तर, जुना कांदा 70 ते 80, आले 90 ते 120, लसूण 270 ते 350 , वाटाणा 100, गवार 130, शिमला मिरची 90 ते 100 रुपये प्रति किलो असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
नागपूरमध्ये अगरबती बनवणाऱ्या फॅक्टरीत आग
नागपूरमध्ये अगरबती बनवणाऱ्या फॅक्टरीत आग. घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन वाहने दाखल झाली असून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू. आग कशी लागली अद्याप अस्पष्ट असून अग्निकांडामुळे फॅक्टरीत प्रचंड नुकसान झाले, अग्निशमन दलातील सूत्रांचे म्हणणे.
धाराशिवमध्ये राहुल मोटेंनी केला 18 ईव्हीएमच्या पडताळणीसाठी अर्ज
धाराशिवमधील परंडा विधानसभा मतदारसंघात निसटता पराभव झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांनी १८ ईव्हीएमच्या पडताळणीसाठी शुल्क भरून शुक्रवारी अर्ज केला आहे.
परंडा मतदारसंघात शिंदेसेनेचे तानाजी सावंत व शरद पवार गटाचे राहुल मोठे यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली. अगदी अखेरच्या फेरीपर्यंत निकाल लांबला होता.
शेवटच्या क्षणी सावंत यांनी आघाडी घेत अवघ्या १५०८ मतांनी बाजी मारली. मात्र, हा निकाल मान्य एका ईव्हीएमसाठी ४७,२०० रुपये राहुल मोटे यांना १८ बूथवरील ईव्हीएमवर संशय आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे रीतसर अर्ज करून १८ मशिनमधील मायक्रो कंट्रोलरची पुन्हा पडताळणी करण्याची मागणी केली.
कोल्हापुरात 5 मतदारसंघांतील 44 मतदान केंद्रावरील EVM ची तपासणी आणि पडताळणीसाठी अर्ज
कोल्हापूर जिल्ह्यातील पाच मतदारसंघांतील ४४ मतदान केंद्रावरील ईव्हीएमची तपासणी आणि पडताळणीसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मतदारसंघांतील उमेदवारांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे लेखी मागणी केली आहे. या प्रक्रियेसाठी पाच मतदारसंघातील उमेदवारांना 20 लाख 76 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर ही तपासणी आणि पडताळणी होईल. चंदगड मतदारसंघातील नंदाताई बाभुळकर, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ऋतुराज पाटील, हातकणंगले मतदार संघातील राजू आवळे, करवीर मतदारसंघातील राहुल पाटील, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर यांनी अर्ज केले आहेत.