जाहिरात
9 hours ago

लाडकी बहीण योजनेचा भव्य कार्यक्रम सोलापूरात होत आहे. यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकत्र येत आहेत. शिवाय महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाच्या बैठकाही होत आहे. शिवाय हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये आज मतमोजणी होत आहे. या निवडणुकीच्या निकालाचे पडसादही राज्यात उमटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या निकालाचे परिणामा आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर होतील असेही बोलले जात आहे. 
 

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर आंदोलकांच्या उड्या

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक

मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर आंदोलकांच्या उड्या

धनगर नेत्यांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारली

रामराजे निंबाळकर सोडणार अजित पवारांची साथ

रामराजे निंबाळकर सोडणार अजित पवारांची साथ 

रामराजे निंबाळकर शरद पवारांसोबत येणार

शरद पवारांचा अजित पवारांसह महायुतीला आणखी एक धक्का 

14 तारखेला रामराजे निंबाळकर हाती घेणार तुतारी 

काँग्रेस राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा - उद्धव ठाकरे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या आधीही त्यांनी ही मागणी केली होती. पण त्याला शरद पवार आणि काँग्रेसने प्रतिसाद दिला नव्हता. हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालानंतर ठाकरेंनी ही मागणी परत केली आहे. 

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी उभ्या असलेल्या रांगेत गोंधळ हाणामारी

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी उभ्या असलेल्या रांगेत गोंधळ हाणामारीची घटना घडली आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकात हाणामारी झाली. मंदिर समितीच्या भोंगळ कारभाराचा फटका भाविकांना बसला आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनावर भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. भाविकांना दर्शनासाठी 8 तासांहून अधिक वेळ रांगेत राहावे लागत आहे. आज चौथ्या मजल्यावरील दर्शन रांगेत पंढरपूरहून आलेल्या 7-8 तरुणांनी रांगेत जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावर हैदराबादहूनआलेल्या भाविकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. यात हैदराबादचे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  

श्रीरामपुरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना अटक

श्रीरामपुरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना श्रीरामपूरातील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेत अटक केली..

जालन्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता

जालन्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे हिकमत उढाण निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिकमत उढाण यांनी या आधी राजेश टोपे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी मविआमध्ये टोपे हे उमेदवार असतील. त्यामुळे उढाण हे पक्ष बदलणार असल्याची चर्चा आहे.  

जळगाव जिल्ह्यात शिवशाही बस, कारचा भीषण अपघात, 3 जण ठार

जळगाव जिल्ह्यातील चोपडा धरणगाव रस्त्यावर शिवशाही बस व कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात कार मधील तीन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. चोपडा शहराजवळ असलेल्या सूतगिरणी जवळ शिवशाही बस व कारची समोरासमोर धडक होवून झाला भीषण अपघात झाला.  

जागा वाटपाबाबत मविआची बैठक आज

वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत जागा वाटपाची चर्चा होणार आहे. मविआचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहाणार आहेत. 

ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे बाबत सरकारची उदासीनता

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीत कांस्यपदक मिळवून देणाऱ्या स्वप्नील कुसाळेला दोन महिने उलटूनही अद्याप राज्य सरकारने जाहीर केलेल्या बक्षीसाची रक्कम मिळालेली नाही. याबाबत त्याच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केलीये. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत असताना कुसाळे यांनी ही नाराजी वर्तवली. सरकारने जाहीर केलेली बक्षीसाची रक्कम तुटपुंजी आहे. नेमबाजांबाबत सरकार इतकं उदासीन आहे, असं माहीत असतं तर स्वप्नीलला नेमबाजीत पाठवलंच नसतं, अशा भावनाही स्वप्नीलच्या वडिलांनी व्यक्त केल्यात. 

'भाजपला मतदान केल्यास मुस्लीम समाजाला मंत्रिपद',भाजप मंत्र्याचे वक्तव्य

मुस्लीम समाजाची मते भाजपला मिळत नाहीत. या समाजाने भाजपला मतदान केल्यास त्यांनाही खासदार किंवा मंत्री केले जाईल, अशी भूमिका केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याकमंत्री किरेन रिजिजू यांनी येथे मांडली. 

गरबा खेळत असताना हार्ट अटॅक येवून दुर्दैवी मृत्यू

गरबा खेळत असताना एकाला अचानकपणे भोवळ आली. काही वेळातच त्याचा मृत्यू ही झाला. हार्ट अटॅक येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुण्याच्या चाकण परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत अशोक माळी या गरबा डान्सरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा स्थगित

सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा स्थगित देण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. कोर्ट आदेश असलेल्या संस्थांच्या निवडणुका मात्र होणार आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे सरकारने स्थगिती आणली आहे. जवळपास  29 हजार 443 संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. 

Previous Article
अहमदनगर हादरलं! क्षुल्लक कारणावरुन दीराचा भावजयांवर कोयत्याने हल्ला, दोघींचा मृत्यू
LIVE UPDATE : धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक, मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर आंदोलकांच्या उड्या
Man-Suffers-Fatal-Heart-Attack-While-Playing-Dandiya-in-Chakan
Next Article
गरबा खेळत असताना भोवळ आली, खाली कोसळला, पुण्यामध्ये भयंकर घडलं