जाहिरात
15 minutes ago
मुंबई:

विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून शेवटच्या टप्प्यातील प्रचारसभा आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. जाहिरातीद्वारे महायुती आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. 

Live Update : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी 

सुप्रिया सुळे यांच्या हेलिकॉप्टर आणि गाड्या देखील तपासल्या 

पुण्यातील भोर मतदार संघाच्या सभेला जाताना सुप्रिया सुळे यांच्या गाड्यांची तपासणी

Live Update : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस...

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस, पुण्यातील अनेक उमेदवारांच्या घरोघरी जात प्रचार तर अनेक उमेदवाराकडून पदयात्रा आणि बाईक रॅलीच आयोजन

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असुन आज 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावतील.. आज अनेक ठिकाणी सर्व प्रमुख नेत्यांच्या सभा पार पडतील.. मात्र दुसरीकडे पुणे शहरातील सर्व उमेदवारांनी आज कुठल्याच मोठया नेत्याची सभा न घेता डोअर टू डोअर जात आणि पदयात्रा काढत लोकांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे.. पुण्याचे कोथरूड विधानसभा मतदार संघाचे भाजप आणि महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी सकाळपासून मतदार संघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.. तर मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी सकाळी मॉर्निंग वॉकला जात नागरिकांशी संवाद साधलाय तर नंतर बाईक रॅली सुद्धा कोथरूड मतदार संघात काढली... सुनील टिंगरे, बापू पठारे, चंद्रकांत मोकाटे या सगळ्या उमेदवारांनी देखील आपल्या मतदारांशी थेट घरी जात संपर्क साधला..तर दुसरीकडे कसबा मतदार संघाचे उमेदवार हेमंत रासने हडपसर मतदार संघाचे उमेदवार प्रशांत जगताप , रवींद्र धंगेकर यांनी देखील बाईक रॅली काढत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.. एकूणच काय तर आज पुण्यात सगळ्याच उमदेवारांनी प्रचाराचा शेवटचा दिवस हा महत्त्वाचा मानत सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मनावर घेतलं असून पुण्यातील आठही मतदार संघातील सर्व उमेदवार आज शेवटच्या दिवशी जोरदार प्रचार करताना दिसले....

Live Update : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जवळपास 1 लाखांची दारू जप्त

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जवळपास 1 लाखाची दारू जप्त 

निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडवर 

छत्रपती संभाजी नगर शहरातील झाल्टा फाटा या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जवळपास 1 लाखाचे मद्य जप्त केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला आंबेडकरनगरमध्ये अवैद्य पद्धतीने मद्य विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्या ठिकाणी विभागाने कारवाई करून जवळपास 1 लाखाचे मद्य जप्त केले. हॉटेलमध्ये काही मद्य पिणाऱ्यांवर  गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मात्र मद्य विकणारा आरोपीला पळ काढण्यात यश मिळाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई महत्त्वाची मानल्या जात आहे.

Live Update : वसई विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील यांच्या प्रचारार्थ मल्लिकार्जुन खरगे, रमेश चेन्निथला यांची सभा

वसई विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील यांच्या प्रचारार्थ आज वसईच्या चिमाजी अप्पा ग्राउंडवर काँग्रेसची भव्य सभा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. वसई विधानसभे मधून विजय पाटील यांच्यासमोर आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह भाजपच्या एड. स्नेहा दुबे पंडित यांचे आव्हान असणार आहे. या सभेसाठी आता गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून विरोधकांना कशाप्रकारे लक्ष केले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Live Update : जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर अज्ञातांकडून गोळीबार

जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहाटेच्या सुमारास अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याची माहिती आहे. जळगाव शहरातील मेहरून परिसरात अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे.  

अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. तर गोळीबार करणाऱ्या अज्ञाताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

Live Update : पुणे जिल्ह्यात 90 टक्के टपाली मतदान

पुणे जिल्ह्यात 90 टक्के टपाली मतदान

2 हजार 210 मतदारांनी बजावला घरबसल्या मतदानाचा हक्क

विधानसभा निवडणुकीत शहरासह जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांतून 85 वर्षांपुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांचे घरबसल्या मतदान आता अंतिम टप्प्यात 

2 हजार 277 मतदारांनी घरबसल्या टपाली मतदानासाठी अर्ज भरून दिला होता. 

जिल्हा निवडणूक प्रशासनाची माहिती

Live Update : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री आज पुण्यात

पुण्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची पत्रकार परिषद 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री आज पुण्यात 

काँग्रेस पक्षाच्या देशभरातील योजनांच रेवंत रेड्डी करणार विश्लेषण  

Live Update : नवी मुंबईमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा

राज्यात प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. बेलापूर मतदारसंघाच्या भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याकरता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी महाविकास आघाडीने बेलापूर मतदारसंघात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने आज सभा आयोजित करण्यात आली आहे. 

Live Update : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बदलापूरमध्ये सभा

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बदलापूरमध्ये सभा

महायुतीचे किसन कथोरे यांच्या प्रचारासाठी सकाळी ११ वाजता होणार सभा

बदलापूर अत्याचार प्रकरण, आरोपीचं एन्काऊंटर यावर मुख्यमंत्री भाष्य करण्याची शक्यता

तर शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे हे कथोरेंच्या प्रचारात सक्रिय नसून आज ते सभेला येतात का? याकडेही लक्ष

Live Update : सुधाकर बडगुजर यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल..

सावता नगर भागात दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडी व महायुतीचे काही कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याने राडा झाला होता. या राड्यानंतर रात्री सुधाकर बडगुजर हे कार्यकर्त्यांसह अंबड पोलीस ठाण्यात येऊन धडकले व जोपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा घेतला होता. 

Live Update : परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला

बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष चांगलाच पेटला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात उभे ठाकलेले उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मुंडेंना आव्हान देत गंभीर आरोप केले आहेत. 

Live Update : तानाजी सावंत यांची वाशी शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत जाहीर सभा

तानाजी सावंत यांची वाशी शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत जाहीर सभा

सभेतून रोहित पवार यांच्या आरोपाला तानाजी सावंत यांचे जाहीर सभेतून उत्तर

Live Update : वांद्रे पश्चिम येथे आमदार आशिष शेलार यांच्या प्रचारार्थ 23 मराठी सेलिब्रिटींचा सहभाग

वांद्रे पश्चिम येथे आमदार आशिष शेलार यांच्या प्रचारार्थ 23 मराठी सेलिब्रिटींचा सहभाग

Listen to the latest songs, only on JioSaavn.com